मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मोदीजी तुम्ही सांत्वनंही केलं नाही..', 9 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेसची टीका

'मोदीजी तुम्ही सांत्वनंही केलं नाही..', 9 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेसची टीका

पुन्हा एकदा राजधानी दिल्ली अतिशय धक्कादायक घटनेमुळं हादरली आहे. अवघ्या 9 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या बलात्कारामुळे (Delhi Rape Case) दिल्ली हादरली आहे. बलात्कारानंतर या चिमुरडीची हत्या करण्यात आली

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: पुन्हा एकदा राजधानी दिल्ली अतिशय धक्कादायक घटनेमुळं हादरली आहे. अवघ्या 9 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या बलात्कारामुळे (Delhi Rape Case) दिल्ली हादरली आहे. बलात्कारानंतर या चिमुरडीची हत्या करण्यात आली, एवढचं नव्हे तर नराधमांनी तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका पुजाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर स्थानिकांनी न्याय आंदोलन करत न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भेट घेतली.

या घटनेनंतर दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेनंतर दिल्लीतील राजकारण तापू लागलं असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव याठिकाणी मागास समाजातील एका नऊ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या आईवडिलांची परवानगी न घेताच घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांनी हा आरोप केला असून, आता या प्रकरणावरून राजकारण तापताना दिसत आहे.

या भेटीनंतर काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी देखील ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'मोदी जी, ज्याने कुणी पीडित दलिताची गळाभेट घेतली आहे त्यालाच त्याचं दु:ख समजू शकतं. पीडितेला न्याय मिळवून देणं तर दूरच पण तुमच्या तोंडून 9 वर्षीय वाल्मिकी समाजाच्या मुलीच्या कुटुंबासाठी सांत्वनाचे दोन शब्दही बाहेर पडले नाहीत. कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हाच संकल्प आहे.'

First published: