राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

विशेष म्हणजे 23 वर्षांनी अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले आणि इकडे राहुल गांधी शरद पवार यांच्या घरी गेले.

  • Share this:

15 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत घरी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाली.

उत्तरप्रदेश पोडनिवडणुकीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गडातच भाजपला पराभवाचा धक्का बसलाय. सपा आणि बसपाने युतीने मिळवलेल्या या विजयामुळे विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर काल बुधवारी दिल्लीत राहुल गांधी यांनी शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. दोघात एक तास चर्चा झाली अशी माहिती आहे. दोनच दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी सर्वच विरोधी पक्षांना स्नेहभोजनासाठी बोलावलं होतं. यावेळी शरद पवार यांनीही हजेरी लावली होती.

विशेष म्हणजे  23 वर्षांनी अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले आणि इकडे राहुल गांधी शरद पवार यांच्या घरी गेले. युपी पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर विरोधकांचे मनोमिलन सुरू झालंय असं म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2018 08:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading