Good By 2018 : जादूच्या या झप्पी नंतर राहुल गांधींचा झाला 'मेकओव्हर'

2018 हे जसं राहुल गांधी यांच्यासाठी महत्त्वाचं वर्ष होतं त्यापेक्षा जास्त महत्त्व 2019 ला लोकसभा निवडणुकीमुळे असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2018 07:39 AM IST

Good By 2018 : जादूच्या या झप्पी नंतर राहुल गांधींचा झाला 'मेकओव्हर'

नवी दिल्ली 26 डिसेंबर : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या 'फॉर्म'मध्ये आहेत. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या यशाने त्यांच्यातला आत्मविश्वास दुप्पट वाढला आहे. गेल्या पाच वर्षात त्यांना मिळालेलं हे मोठं यश आहे. नरेंद्र मोदींच्या झंझावतापुढे राहुल गांधी टिकणारच नाही असं म्हणत असताना 2018 च्या शेवटी मात्र राहुल गांधींचा यांचा पूर्ण मेकओव्ह झालेला दिसला. यात सगळ्यात मोठा वाटा होता तो राहुल यांच्या मोदींना भर सभागृहात दिलेल्या जादूच्या झप्पीचा.


सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींची यथेच्छ टिंगल टवाळी करण्यात येत होती. राहुल गांधी म्हणजे पप्पू अशीही त्यांची संभावना केली गेली. पण राहुल यांनी आपली ही प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकण्यात यश मिळवलं. यासाठी त्यांना मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागलं.


शांत, विनम्र काहीसे गोंधळलेले, गृहपाठ करून बोलणारे अशी राहुल यांची प्रतिमा होती. पण मोदींना टक्कर द्यायची असेल तर आणि काँग्रेसमध्ये जान आणायची असेल तर ही प्रतिमा बदलणं राहुल यांना भाग होतं.  काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मार्च महिन्यात राहुल गांधी यांनी केलेलं भाषणं हे कमालीचं आक्रमक आणि राहुल गांधी बदलल्याचं चिन्ह होतं. सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतं खऱ्या अर्थानं राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व दिलं आणि राहुल यांनीही आपण लढाईला तयार असल्याचं आपल्या भाषणातून दाखवून दिलं.

Loading...राहुल यांच्या मेकओव्हर मधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला तो त्यांचं लोकसभेतलं गाजलेलं भाषण. पंतप्रधान मोदी अहंकारी आहेत. सगळं फक्त आपल्यालाच समजतं अशी टीका करत त्यांनी मोदींना थेट अंगावर घेतंल. मी सत्य बोलत असल्यामुळे मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही असं ते म्हणाले. आपल्या भाषणाच्या शेवटी ते अचानक चालत मोदींच्या आसनाजवळ गेले आणि त्यांनी मोदींना मिठी मारली. मी व्देषाचं नाही तर प्रेमाचं राजकारण करतो असं म्हणत त्यांनी मोदींवर केलेला प्रेमवर्षाव चांगलाच गाजला.नंतर राफेल मुद्यावरून त्यांनी  आक्रमकपणे मोदींवर हल्लाबोल केला. चौकिदार चोर है अशी घोषणाच त्यांनी दिली. मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. चोर आहेत असा थेट हल्ला करायला त्यांनी सुरूवात केली. त्यांच्या या आक्रमकतेची मोदींनाही दखल घ्यावी लागली. सातत्याने हल्लाबोल करून त्यांनी मोदींची हुकूमशहा अशी संभावनाही केली.ट्विटरच्या माध्यातूनही ते मोदींवर थेट हल्लाबोल करू लागले. त्यांच्या हल्ल्याची धार दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे 2019 ची निवडणुक ही पाहिजे तेवढी सोपी जाणार नाही याची भाजपला आता खात्री झाली आहे.
"मला पप्पू म्हणून हिणवलं गेलं, टिंगल टावाळी केली गेली त्यातूनच मी शिकलो" असं सांगत राहुल यांनी आपण आता बदलल्याचे पूर्ण संकेत दिले आहेत.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आता  पूर्णपणे मेक ओव्हर झालेल्या राहुल गांधींचा सामना 2019 मध्ये करावा लागणार आहे. 2018 हे जसं राहुल यांच्यासाठी महत्त्वाचं वर्ष होतं त्यापेक्षा जास्त महत्त्व 2019 ला असणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने राहुल यांची खरी परीक्षा असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 07:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...