मोदींवर टीका करताना राहुल गांधींकडून झाली मोठी स्पेलिंग मिस्टेक; टीकेची उठली झोड

मोदींवर टीका करताना राहुल गांधींकडून झाली मोठी स्पेलिंग मिस्टेक; टीकेची उठली झोड

भारत आणि चीनमधील तणावादरम्यान सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सलग पाचव्या दिवशी राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून : भारत आणि चीनमधील तणावादरम्यान सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी सलग पाचव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधींनी रविवारी ट्विट केले की, नरेंद्र मोदी खरंतर ‘सरेंडर मोदी’ आहेत. मात्र इंग्रजीतून सरेंडर हा शब्द लिहिताना त्यांची चूक झाली. आणि त्यांनी सरेंडरऐवजी सुरेंदर लिहिलं. यानंतर ट्विटर वापरकर्त्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही राहुल यांनी थेट प्रश्न विचारला होता. यावर संरक्षणमंत्री म्हणाले होते की, गलवान व्हॅलीमधील आमचे सैनिक शहीद झाल्याने दु:खी आहोत. राहुलने त्यांना विचारले होते की, आपण चीनचं नाव का घेत नाह। भारतीय सैन्याचा अपमान का करता? सैनिक जेव्हा शहीद होत असतात तेव्हा तुम्ही भांडण करताय? गोष्टी का लपवल्या जात आहेत?

हे वाचा-काँग्रेस-भाजपच्या वादात जखमी जवानाची होरपळ, या वक्तव्यानंतर कुटुंब झालं बेपत्ता

 

First published: June 21, 2020, 5:45 PM IST

ताज्या बातम्या