राहुल गांधींच्या अमेठीतील पराभवामागे सपा – बसपा?

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अमेठीतील पराभवामागे काय आहे कारण?

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 03:59 PM IST

राहुल गांधींच्या अमेठीतील पराभवामागे सपा – बसपा?

नवी दिल्ली, 01 जून : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. तर, राहुल गांधी यांचा अमेठीमधून झालेला पराभव हा काँग्रेससाठी देखील मोठा धक्का होता. कारण, अमेठी हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदार संघ आहे. राहुल गांधींचा अमेठीमधून पराभव का झाला? यामागील कारणांचा शोध आता घेतला गेला आहे. दोन सदस्यीय समितीनं दिलेल्या रिपोर्टनुसार सपा आणि बसपामुळे राहुल गांधींचा पराभव झाल्याचं म्हटलं आहे. के. एल. शर्मा आणि जुबेर खान यांनी हा अहवाल सादर केला आहे. दोन्ही नेत्यांनी अमेठीतील पाच आमदारांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर हा निष्कर्ष काढला गेला आहे. या रिपोर्टमध्ये सपा आणि बसपानं मदत केली नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.


यूपीएससी परीक्षेत नापास होऊनही तो फिरत होता आयजी बनून

का झाला पराभव

सपा – बसपानं उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेकरता आघाडी केली होती. पण, त्यांनी गांधी घराण्याविरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. पण, हेच कारण राहुल गांधी यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं स्थानिक नेत्याचं म्हणणं आहे. उमेदवार नसल्यामुळे सपा आणि बसपाच्या मतदारांनी भाजपला मतदान केल्याचं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Loading...


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना EDचं समन्स

काय आहे मतांचा आकडा

2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना 4, 08, 651 मतं मिळाली होती. तर, 2019मध्ये त्यांना 4, 13, 994 मतं मिळाली. 2014मध्ये बसपा उमेदवाराला अमेठीमध्ये 57, 000 मतं मिळाली होती. तर, 2019मध्ये राहुल गांधी यांना 55, 000 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण, उमेदवार नसल्यानं सपा – बसपाचे मतदार भाजपकडे वळल्याचं बोललं जात आहे.

पुढील आठवड्यात सोपवणार रिपोर्ट

दोन सदस्यीय समिती पुढील आठवड्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाकडे याबाबतचा अहवाल सोपवणार आहे.


VIDEO: ईडीच्या झटक्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अर्धवट सोडली बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...