लोकसभेत राहुल बॅकबेंचर! सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे काँग्रेस समर्थकांना बसेल धक्का

लोकसभेत राहुल बॅकबेंचर! सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे काँग्रेस समर्थकांना बसेल धक्का

Rahul Gandhi यांना लोकसभेत पहिल्या रांगेत बसता येणार नाही. काँग्रेसने केलेली तिसऱ्या जागेची मागणी फेटाळण्यात आल्याने त्यांना आता मागे बसण्यावाचून पर्याय नाही. पण सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्या कुठल्या निर्णयामुळे राहुलवर मागे बसायची वेळ आली?

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जुलै : लोकसभेत विरोधकांच्या पहिल्या रांगेत आता राहुल गांधी Rahul Gandhi दिसणार नाहीत. काँग्रेसने लोकलेखा समितीचे (PAC) अध्यक्ष म्हणून अधीररंजन चौधरी Adhir Ranjan Chowdhury यांचं नाव पुढे केलं गेलं. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीच अधीररंजन चौधरींचं नाव सुचवलं होतं. Public Accounts Committee म्हणजेच लोकलेखा समितीचा अध्यक्ष हे लोकसभेत मानाचं पद असतं. त्यांची जागासुद्धा पहिल्या रांगेत असते. त्यामुळे अधीररंजन यांना पहिल्या रांगेत जागा मिळेल. पण त्यामुळे राहुल गांधी यांना मात्र लोकसभेत पहिल्या रांगेतलं सीट मिळण्याची चिन्हं नाहीत.

काँग्रेस संसदीय गटाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी Sonia Gandhi आणि PAC अध्यक्ष म्हणून अधीररंजन चौधरी यांना पहिल्या रांगेत बसता येईल. या दोघांशिवाय पहिल्या रांगेत राहुल गांधी यांना सीट देण्याची मागणी काँग्रेसने केली होती. पण काँग्रेसची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पहिल्या रांगेत दिसणार नाहीत. त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत जागा दिली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांना लोकसभेत पहिल्या रांगेत जागा देण्यासाठी सरकारने नकार दिला आहे. काँग्रेसला दोन जागा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक जागा अधीर रंजन चौधरी आणि एक जागा सोनिया गांधी यांना देण्यात आली आहे त्यामुळे तिसरी जागा देण्यास नकार दिला आहे.नव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या शेजारी पहिल्या रांगेत बसत होते.

पासपोर्ट बनवणाऱ्या या बनावट वेबसाइट्सपासून सावधान!

आता राहुल यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणूनही राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता लोकसभेत जागांचं वाटप करण्यात येत आहे. या नवीन रचनेनुसार राहुल यांना पहिल्या बाकावर जागा मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे. सोनिया आणि अधीररंजन यांच्या बाजूची तिसरी जागा टी. आर. बालू यांना मिळू शकते. ते द्रमुकचे नेते आहे. DMK हा काँग्रेसच्या नंतर सर्वाधिक जागा मिळवणारा विरोधी पक्ष ठरला आहे.

'हम पाकिस्तानी हैं, पाकिस्तान हमारा हैं' काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांची नारेबाजी

त्यामुळे या पक्षासाठी पहिल्या रांगेतली एक जागा ठेवण्यात आली आहे. याशिवाय तृणमूल आणि समाजवादी पक्षाला एखादी जागा पहिल्या रांगेत मिळू शकते. या पक्षांचं संख्याबळ यापेक्षाही या पक्षातल्या नेत्यांची ज्येष्ठता पाहून लोकसभा सभापती त्यांना पहिल्या रांगेत बसायला जागा देऊ शकतात.

VIDEO शिवसेना म्हणते आमचं ठरलंय, तर भाजपनेही केला तसाच दावा; पण नेमकं ठरलंय तरी काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 06:46 PM IST

ताज्या बातम्या