नवी दिल्ली, 23 जानेवारी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. लग्नासाठी योग्य मुलीची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य मुलगी मिळताच ते लग्न करणार. ते म्हणाले की त्यांच्या आईवडिलांचं 'वैवाहिक जीवन खूप आनंदी' होतं, त्यामुळे त्याच्या जीवनसाथीकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. 'कर्ली टेल्स' या YouTube वरील फूड आणि ट्रव्हल प्लॅटफॉर्म असलेल्या 'कर्ली टेल्स'शी केलेल्या हलक्याफुलक्या गप्पांमध्ये, 52 वर्षीय राहुलने त्यांच्या लहानपणीच्या आठवणीपासून ते आवडते पदार्थ आणि व्यायामाविषयीच्या प्रेमापर्यंत अनेक गैर-राजकीय विषयांवर चर्चा केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना लग्न करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, माझ्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते आणि ते एकत्र राहत होते. त्यांचं ऐकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे माझ्या अपेक्षा खूप जास्त आहेत. राहुल म्हणाले, “मला योग्य मुलगी सापडल्यावर मी लग्न करेन. जेव्हा अशी मुलगी भेटेल तेव्हा चांगलं होईल." आपल्या पत्नीच्या गुणांची यादी तयार केली आहे का असे विचारल्यावर राहुल म्हणाले, "नाही! मला फक्त एक प्रेमळ मुलगी हवी आहे, जी समंजस असेल.
काहीही खायला आवडतं
'भारत जोडो यात्रे'च्या राजस्थान टप्प्यात राहुल यांच्या कंटेनरबाहेर 'डिनर' दरम्यान झालेल्या या गप्पांचा व्हिडिओ काँग्रेसने रविवारी शेअर केला. व्हिडीओमध्ये राहुल म्हणतायेत की ते जास्त अन्न घेत नाही आणि जे मिळेल ते खातात, पण त्यांना 'मटर आणि फणस' आवडत नाही. सप्टेंबर 2022 मध्ये तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू करणारे राहुल सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. गप्पांमध्ये, त्यांनी सांगितले की घरी ते त्यांच्या आहाराबद्दल "खूप कडक" आहेत. मात्र, "प्रवास करताना त्याच्याकडे फारसा पर्याय नसतो".
वाचा - Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना द्यायचाय राजीनामा, पंतप्रधान मोदींना सांगितली 'मन की बात'
राहुलला गावरान जेवण आणि मांसाहार आवडतो
माजी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की त्यांच्या मते तेलंगणाचे अन्न "थोडे तिखट आणि मसालेदार" आहे. मी एवढं तिखट खात नाही." आपल्या घरी कोणत्या प्रकारचे अन्न शिजवले जाते असे विचारले असता, राहुलने सांगितले की दिवसा "देसी फूड" आणि रात्री काही कॉन्टिनेंटल (युरोपियन देश) पाककृती शिजवल्या जातात. ते म्हणाले की ते मध्यम आहार घेतात आणि मिठाई खाणे टाळतात. राहुलने सांगितले की ते मांसाहाराचे शौकीन आहेत. त्यांना चिकन, मटण आणि सीफूड आवडते. त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थाबद्दल विचारले असता काँग्रेस नेत्याने सांगितले की त्यांना चिकन टिक्का, सीख कबाब आणि ऑम्लेट खायला आवडते. त्यांना सकाळी एक कप कॉफी प्यायला आवडते असेही त्यांनी सांगितले.
सेंट स्टीफन्स ते हार्वर्ड विद्यापीठापर्यंतच्या शिक्षणाचा उल्लेख
जेव्हा राहुल यांना त्याच्या उच्च शिक्षणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “मी एक वर्ष सेंट स्टीफनमध्ये होतो. मी तिथे इतिहासाचा अभ्यास केला. त्यानंतर मी हार्वर्ड विद्यापीठात गेलो, जिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला. काँग्रेस नेत्याने सांगितले की, मे 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. राहुलने सांगितले की, त्यांना फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये पाठवण्यात आले, जिथे त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी सांगितले की त्यांनी यूकेच्या केंब्रिज विद्यापीठातून 'डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स'मध्ये 'मास्टर्स डिग्री' देखील घेतली आहे.
मॉनिटर कंपनीत नोकरी, पगार होता 3 हजार पौंड
आपल्या पहिल्या नोकरीबद्दल राहुलने सांगितले की, त्यांनी लंडनच्या स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझरी फर्म 'मॉनिटर कंपनी'मध्ये काम केलं. तेव्हा ते 24-25 वर्षांचे असावेत. माजी काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले की, त्यांना पहिला पगार म्हणून अडीच ते तीन हजार पौंडांचा चेक मिळाला होता. राहुल म्हणाले की, जर ते पंतप्रधान झाले तर ते तीन गोष्टी करतील, पहिली- शिक्षण व्यवस्था बदलणे, दुसरे- लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करणे आणि तिसरे- शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसारख्या कठीण काळातून जात असलेल्या लोकांना मदत करणे.
वाचा - राणेंचं भाषण, नीलम गोऱ्हेंचा आक्षेप, भुजबळांचा हात, विधानभवनातल्या गोंधळाचा Video
राहुलने फिटनेसचे रहस्य उलगडले
फिटनेससाठी चर्चेत असलेल्या राहुलने स्कूबा डायव्हिंग, फ्री डायव्हिंग, सायकलिंग, बॅकपॅकिंग आणि मार्शल आर्ट या खेळांबद्दलही सांगितले. ते म्हणाले, “मी कॉलेजमध्ये बॉक्सिंग करायचो. मी नेहमीच काही ना काही व्यायाम केला आहे. मार्शल आर्ट्स खूप सोयीस्कर आहेत. ते हिंसक व्हायला शिकवत नाहीत, तर त्याच्या अगदी उलट आहे. पण मार्शल आर्टचा चुकीचा अर्थ लोकांना इजा करण्यासाठी, त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लावला जातो. जर तुम्ही त्याचा उद्देश नीट समजून घेतलात तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. राहुल यांनी सांगितले की, प्रवासादरम्यान ते रोज मार्शल आर्टचा 'क्लास' घेतात.
राहुलच्या पर्समध्ये शिव आणि रुद्राक्ष
झोपताना पलंगाच्या डोक्यावर ठेवलेल्या वस्तूंबद्दल राहुलला विचारले असता, राहुलने सांगितले की, त्यांच्या पलंगाच्या ड्रॉवरमध्ये रुद्राक्ष, शिव आणि इतर देव-देवतांची चित्रे आणि त्याचे पाकीट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Rahul gandhi