राहुल गांधींचे वकील म्हणाले, '50 हजार नको प्लीज, 15 हजारांत जामीन करा'

राहुल गांधींचे वकील म्हणाले, '50 हजार नको प्लीज, 15 हजारांत जामीन करा'

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या कोर्टात हजेरी लावत आहेत. अहमदाबादमधल्या एका मानहानीच्या खटल्यात कोर्टाने राहुल गांधींना 50 हजार रुपयांच्या जामिनाचा आदेश दिला. त्यावर प्लीज, 15 हजार रुपयांत करा, असं त्यांचे वकील म्हणाले.

  • Share this:

अहमदाबाद, 12 जुलै : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या कोर्टात हजेरी लावत आहेत. अहमदाबादमधल्या एका मानहानीच्या खटल्यात कोर्टाने राहुल गांधींना 50 हजार रुपयांच्या जामिनाचा आदेश दिला. त्यावर प्लीज, 15 हजार रुपयांत करा, असं त्यांचे वकील म्हणाले.

कोर्टाने राहुल गांधींना विचारलं, तुम्ही दोषी आहात का ? त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिलं, नाही, 'मी दोषी नाही.'

कोर्ट म्हणालं, तुम्ही स्वत:चा बचाव करू इच्छिता का? त्यावर राहुल गांधी उत्तरले, 'हो. मी माझा बचाव करू इच्छितो.' राहुल गांधींनी त्यानंतर त्यांची कागदपत्रं पाहण्यासाठी हात पुढे केले. त्यांनी त्यांच्या पत्त्यामधलं तुघलक रोड आणि पार्लमेंट या दोन शब्दांचं स्पेलिंग चुकल्याचं सांगितलं. त्यावर कोर्टाने ही स्पेलिंग दुरुस्त करण्याचा आदेश दिला.

50 हजार नाही... 15 हजार

या खटल्यात राहुल गांधींना जामीन मिळू शकतो, असं कोर्टाने सांगितलं. कोर्टाने पहिल्यांदा त्यांना 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. त्यावर राहुल गांधींच्या वकिलांनी, हा जामीन 15 हजार रुपये करा, अशी विनंती केली. कोर्टाने ती मान्य केली आणि अशा रितीने जामिनाचे 35 हजार रुपये वाचले.

VIDEO : चालत्या रेल्वेतून पडणारी महिला अशी बचावली !

राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून नाबार्ड बँकेवर काही आरोप केले होते. ही याचिका मुंबईच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने दाखल केली होती.

या प्रकरणी राहुल गांधींना 27 मे ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राहुल गांधींच्या विनंतीवरून त्यांना कोर्टाने मुदत वाढवून दिली आणि 12 जुलैला हजर राहण्याची परवानगी दिली.

==================================================================================================

SPECIAL REPROT : चोराला तुरुंगात नव्हे तर शाळेत दाखल करणारा पुणेरी पोलीस!

First published: July 12, 2019, 9:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading