नवी दिल्ली, 18 मार्च : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना व्हायरसाचा (Covid - 19) फैलाव व रुग्णांच्या परिस्थितीवर सरकार आणि आरोग्य मंत्रालय सातत्याने लक्ष ठेवून आहे. असं असलं तरी राजकीय नेत्यांमधील टीका-टिप्पणी काही थांबण्याचं नाव घेत नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी कॉंग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल (Rahul Gandhi) गांधी यांचे नाव न घेता एक ट्विट केले आहे. त्यांच्यावर निशाणा साधत लिहिले आहे की, "बूझो ते जाने !!! एक मुलगा कोरोनाच्या भीतीपोटी सुट्टीसाठी आपल्या आजीच्या घरी जाऊ शकला नाही!" यापूर्वीही भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या इटली दौऱ्यावरुन त्यांना लक्ष्य केलं होतं.
संबंधित - धक्कादायक! परदेशातील तब्बल 276 भारतीय कोरोनाग्रस्त
यापूर्वी दिल्लीचे भाजप खासदार रमेश बिधूरी म्हणाले होते की, राहुल गांधी अलीकडेच इटलीहून परत आले आहेत. विमानतळावर त्यांची तपासणी झाली की नाही हे मला ठाऊक नाही. त्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, म्हणजे त्यांना या जीवघेण्या आजाराची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होईल.
बूझो तो जाने !!!
कोरोना के डर से एक बालक छुट्टियां मनाने अपनी नानी के घर न जा सका!
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) March 18, 2020
भाजप (BJP) नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कोरोना व्हायरस तपासणीसंदर्भात पक्षाकडून स्पष्टीकरण दिलं होतं. काँग्रेसने सांगितलं होतं की, 29 फेब्रुवारीला राहुल गांधींची इटलीमधून (Italy) भारतात परत येताना दिल्ली विमानतळावर तपासणी करण्यात आली. राहुल गांधींनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावावरुन सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची तुलना टायटॅनिक कॅप्टनशी केली होती.
संबंधित - कोरोनासाठी रक्ताची चाचणी केली जात नाही तर...., आरोग्य विभागाचा मोठा खुलासा
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या पुष्टी झालेल्या घटनांची संख्या वाढून 142 झाली आहे. सरकारने जारी केलेल्या अतिरिक्त ट्रॅव्हल अॅडव्हायझरीनुसार अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशिया येथून येणाऱ्या प्रवाशांना सरकारने बंदी घातली आहे. यापूर्वी सोमवारी सरकारने 18 ते 31 मार्च दरम्यान युरोपियन युनियन देश, तुर्की आणि ब्रिटनमधील प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली होती.