News18 Lokmat

'राहुलचा पराभव करणारच'; या नेत्यानं घेतली शपथ

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट राहुल गांधी यांनी आव्हान दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 04:33 PM IST

'राहुलचा पराभव करणारच'; या नेत्यानं घेतली शपथ

तिरूअनंतपुरम, 31 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यावर आता उलट-सुलट राजकीय प्रतिक्रिया देखील पुढे येत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांचा निर्णय  केरळचे मुख्यमंत्री के. विजयन यांना पटलेला नाही. काँग्रेसच्या घोषणेनंतर त्यांनी त्यावर टीका केली आहे. शिवाय, आपली नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी डाव्यांना आव्हान दिलं असून त्यांनी भाजपाविरोधात लढायला हवं होतं. पण, ते आता डाव्यांना आव्हान देत आहेत अशी प्रतिक्रिया के. विजयन यांनी दिली आहे. शिवाय, प्रकाश करात यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.



Loading...


2014च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना श्रृती इराणी यांनी आव्हान दिलं होते. आता 2019मध्ये देखील स्मृती इराणी राहुल गांधी यांना आव्हान देणार आहेत.

अमित शहांची टीका

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलं. राहुल गांधी वायनाडमधून देखील निवडणूक लढणार आहेत. यावर एका जाहीर सभेदरम्यान बोलताना अमित शहा म्हणाले की, मी व्हॉट्सअ‍ॅपवर राहुल गांधी वायनाड या ठिकाणीहून देखील लढणार असल्याचं वाचलं. त्यांना केरळमधून का लढावं लागत आहे? राहुल गांधी यांनी अमेठीसाठी काय केलं हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना वायनाड या ठिकाणीहून लढायचं आहे. असा शब्दात अमित शहा यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं.


वायनाडमधून राहुल गांधी मैदानात

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश आणि केरळ या दोन राज्यातील मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते ए.के.एन्टनी यांनी दिली. राहुल गांधी अमेठीसोबतच वायनाड येथूनही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीदेखील यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागा लढवणार आहे.

केरळमधली वायनाडची जागा सध्या रिक्त आहे. 2014 मध्ये निवडून आलेले खासदार एम. एल. शहनवाझ यांचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं. त्यामुळे वायनाडच्या जागेवर कोणीही उमेदवार नव्हता. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी वायनाडमधून राहुल यांनीच निवडणूक लढावी यासाठी आग्रह धरला होता. अखेर राहुल गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.


VIDEO: लतादीदींनी अनेक वर्षांनी गायलं 'हे' गाणं; जवानांना समर्पित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...