नवी दिल्ली 30 जानेवारी : राफेलचा वाद थांबायला तयार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी स्पष्टीकरण देत राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत राफेलवर कुठलीही चर्चा झाली नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करत राहुल गांधींवर कडक टीका केलीय.
पर्रिकरांसोबतच्या बैठकीचं राजकारण करून राहुल गांधींनी असंवेदनशीलता दाखवली आहे अशी टीका शहा यांनी केली. ते म्हणाले, जो नेता गंभीर आजाराशी झुंझ देत आहे त्याच्याबाबात राहुल गांधी यांनी खोटी विधानं केली. तुम्ही एवढे कसे असंवेदनशील आहात असा प्रश्नही शहांनी राहुल गांधी यांना विचारला आहे. तुमच्या या वागण्याने देशातले लोक कंटाळले आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
गोव्याच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पणजीत मनोहर पर्रिकरांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर राजकारणाला सुरूवात झाली.
Dear Rahul Gandhi, you showed how insensitive you are, by lying in the name of a person fighting a disease.
— Amit Shah (@AmitShah) January 30, 2019
The people of India are disgusted by your reckless behaviour.
In his trademark style, @manoharparrikar ji sets the record straight. https://t.co/ok4GN8I6yS
राफेल डीलवर समोर आलेल्या एका ऑडिऑ क्लीपवरून सुरू असलेला वाद ताजा असतानाच राहुल गांधी यांनी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावर चर्चा केली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
तर एककीकडे, राहुल गांधी हे त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पर्रिकरांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी ते पोहचले असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.
मनोहर पर्रिकरांसोबतची ही खासगी बैठक होती असं म्हणत राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं. 'आज सकाळी मी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. ते लवकर बरे व्होओ अशी प्राथर्ना आहे. हा माझा खासगी दौरा होता' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा