Home /News /national /

गुलाम नबी आझादांनी सांगितली वादळी बैठकीतली Inside Story, काँग्रेस नेत्यांवरच केला हल्लाबोल

गुलाम नबी आझादांनी सांगितली वादळी बैठकीतली Inside Story, काँग्रेस नेत्यांवरच केला हल्लाबोल

'आम्ही लिहिलेलं पत्र लिक झालं तर त्यात काहीही मोठी गोष्ट नसून त्या कुठलंही गुपीत नव्हतं. सुधारणांची मागणी करणं हा शिस्तभंग नाही.'

    नवी दिल्ली 27 ऑगस्ट: काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर (CWC Meeting) सुरु झालेलं वादळ शांत होण्याची शक्यता दिसत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad ) यांनी पुन्हा नवी मागणी केली आहे. काँग्रेसला मजबुत करायचं असेल तर  काँग्रेस कार्यकारणीच्या सर्व जागांसाठी निवडणुक घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी या नेत्यांना फटकारलं असं सांगितलं जात होतं. नंतर असं काही झालंच नाही अशी सारवासारव काँग्रेसने केली होती. आता आझादांनी बैठकीत काय झालं ते पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आझाद म्हणाले, बैठकीच्या सुरुवातीला राहुल गांधींना Rahul Gandhi आम्ही लिहिलेल्या पत्रावर आक्षेप होता. त्यानंतर राहुल आणि सोनिया गांधी यांनी महिना भरात निवडणुका घेऊ असं सांगितलं. पण कोरोनामुळे ते सध्याच शक्य नाही. त्यामुळे आम्हीच त्यांना पुढचे सहा महिने पदावर राहावं अशी विनंती केली. आम्ही लिहिलेलं पत्र लिक झालं तर त्यात काहीही मोठी गोष्ट नसून त्या कुठलंही गुपीत नव्हतं. सुधारणांची मागणी करणं हा शिस्तभंग नाही असंही ते म्हणाले. आझाद म्हणाले, ज्या लोकांना थेट ‘अपाईंटमेंट कार्ड’ मिळतं तेच आमच्या प्रस्तावांना विरोध करतात असा हल्लाबोलही त्यांनी केला. ब्लॉक आणि जिल्हा अध्यक्षांपासून ते थेट काँग्रेस कार्यकारणीचे सर्व सदस्य हे निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडले पाहिजेत. यामुळेच काँग्रेस मजबूत होणार आहे. जे विरोध करतात ते थेट नियुक्त झालेले आहेत असंही त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे युवा नेते जितीन प्रसाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी केल्याने त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनीच हल्ला केला. कपील सिब्बल यांनी यावरून आपल्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना सुनावलं असून काँग्रेसच्या नेत्यांवर नाही तर भाजपवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या