राहुल गांधी आणखी अडचणीत, अमित शहांची बदनामी केल्याप्रकरणी समन्स

राहुल गांधी आणखी अडचणीत, अमित शहांची बदनामी केल्याप्रकरणी समन्स

राहुल गांधींनी अमित शहा यांचा उल्लेख एका खून प्रकरणातले आरोपी असा केला होता. त्यावरून भाजपच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणी गुजरात कोर्टाने त्यांना समन्स पाठवलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मे : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर राफेल प्रकरणात चौकिदार चोर है या वक्तव्यामुळे माफीनामा लिहिण्याची वेळ आली आहे. त्यातच आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांची बदनामी केल्याप्रकरणी गुजरात कोर्टाने त्यांना समन्स पाठवलं आहे.

खून प्रकरणातले आरोपी

राहुल गांधींनी अमित शहा यांचा उल्लेख एका खून प्रकरणातले आरोपी असा केला होता. त्यावरून कृष्णवदन ब्रह्रभट या भाजपच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी सीबीआय कोर्टाने अमित शहा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी त्यांचा खून प्रकरणातले आरोपी असा उल्लेख करणं चुकीचं आहे, असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं. यावरून गुजरात कोर्टाने राहुल गांधींना समन्स पाठवलं आहे. मध्य प्रदेशमधल्या जबलपूरच्या सभेमध्ये राहुल गांधींनी अमित शहा यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं होतं. '

'चौकिदार चोर है'

राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाची माफी मागितली आहे. राफेल प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी 'चौकीदार चोर है' असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. पण आम्ही असं कोणतंही विधान केलेलं नाही, असं स्पष्टीकरण कोर्टाने दिलं.

नवं प्रतिज्ञापत्र

आता राहुल गांधी राफेल प्रकरणी सोमवारी पुन्हा एकदा नवं प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत. यामध्ये या वक्तव्याबद्दल खेद हा शब्द नसेल तर स्पष्टपणे माफी मागितलेली असेल.

राहुल गांधी यांच्यातर्फे त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, मी तीन चुका केल्या आणि त्याबद्दल मी माफी मागतो. सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन मी जे म्हटलं ते चुकीचं होतं. पण अभिषेक मनु सिंघवी यांच्या या माफीनाम्याने कोर्टाचं समाधान झालं नाही.

==============================================================================

VIDEO : भावासाठी प्रियांका गांधींची अमेठीत विराट रॅली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या