मराठी बातम्या /बातम्या /देश /ही राजकीय खेळी की फिटनेस? गल्ली ते दिल्ली आहे राहुल गांधींच्या टी-शर्टची चर्चा

ही राजकीय खेळी की फिटनेस? गल्ली ते दिल्ली आहे राहुल गांधींच्या टी-शर्टची चर्चा

गल्ली ते दिल्ली आहे राहुल गांधींच्या टी-शर्टची चर्चा

गल्ली ते दिल्ली आहे राहुल गांधींच्या टी-शर्टची चर्चा

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत टी-शर्टमधील राहुल गांधींचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली, 27 डिसेंबर : सध्या कडाक्याची थंडी पडू लागली आहे. दिल्लीमध्ये तर थंडीचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. तापमान तब्बल 3 ते 5 अंशापर्यंत खाली येत आहे. त्यामुळे दिल्लीतील लोक अगदी स्वेटर, कानटोप्या, जॅकेट्स, हातमोजे असे गरम कपडे घालूनच फिरताना दिसतात. मात्र, अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो व्हायरल होतोय. आश्चर्याची बाब म्हणजे कडाक्याच्या थंडीतही ते केवळ पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये फिरताना दिसताहेत. त्यामुळे त्यांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चालू आहे.

    7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रे'वर निघालेल्या राहुल गांधी यांना या संपूर्ण यात्रेत आतापर्यंत तुम्ही फक्त पँट आणि टी-शर्ट परिधान केले असल्याचं पाहिलं असेल. पण आता राहुल गांधी यांच्या याच टी-शर्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांपूर्वी 'भारत जोडो यात्रा' घेऊन दिल्लीत पोहोचले. या वेळी त्यांनी त्यांची आई काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीचे विविध फोटो समोर आलेत; पण यातील एक फोटो असा होता की, ज्या फोटोमुळे अनेकांना भावनिक केलं. या फोटोमुळे देशभरात राहुल गांधी यांच्या बाजूनं तसेच विरोधात सुद्धा चर्चा सुरू झाली. पांढरा टी-शर्ट घातलेले राहुल गांधी व त्यांच्याशी संवाद साधताना सोनिया गांधी या फोटोत दिसत आहेत. पण हा फोटो पाहून असं वाटतं की, सोनिया गांधी त्यांच्या मुलाकडे पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत, व म्हणत आहेत की, एवढ्या कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट का घातला आहेस? विशेष म्हणजे काल, सोमवारी (27 डिसेंबर 2022) रोजी सकाळी दिल्लीचं तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं. पण एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्येही राहुल गांधी पांढरा टी-शर्ट घालून देशातील दिग्गज दिवंगत नेत्यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यानंतर मात्र काही लोक राहुल गांधींची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशीसुद्धा करू लागलेत.

    वाचा - 'ही फक्त सुरुवात! कोरोनाची नवी लाट जगभरात कहर करणार आणि लाखो लोकांचा..', शास्त्रज्ञांचा दावा

    दुसरीकडे राहुल गांधी यांना टी-शर्टमध्ये पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की, माजी काँग्रेस अध्यक्षांना थंडी का वाजत नाही? काँग्रेस समर्थक ट्विटर यूजर्स तर भारत जोडो यात्रा 'तपश्चर्या' आणि राहुल हे ‘तपस्वी’ असल्याचे म्हणत आहेत. चांगल्या फिटनेसमुळे दिल्लीतील कडाक्याच्या थंडीवरही राहुल गांधी यांनी मात केल्याचं ते सांगतात. मनजित नावाच्या एका ट्विटर युजरनं म्हटलं आहे की, ‘तपश्चर्या करणाऱ्यांना थंडी किंवा उष्णता जाणवत नाही... तपस्वी फक्त त्यांची तपश्चर्या लक्षात ठेवतात... राहुल गांधीही त्यांची तपश्चर्या करत आहेत... तपश्चर्याचं तेज वेगळंच असतं.’ तर, लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनं ट्विट केलं की, 'राहुल गांधींच्या उर्जेचे रहस्य काय आहे, तर त्यांची फिटनेस पातळी... उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत ते फक्त टी-शर्ट घालून फिरत आहेत. देवा, त्यांना भारताचे नेतृत्व करण्यासाठी उत्तम आरोग्य दे.’

    काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी ट्विट केलं की, 'केवळ टी-शर्टमध्ये 6 डिग्री सेल्सिअस तापमानात कसे जगू शकतात? असा आत्मसंयम, आत्मबल हे फक्त संन्याशांकडे असतं.’ याशिवाय, एका काँग्रेस नेत्याला हिवाळ्यात राहुल गांधी हे टी-शर्ट घालून फिरत असल्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले, 'नेते नेहमी तोच पोशाख परिधान करतात, जो समाजात प्रचलित असतो. आजकाल विशेषत: तरुण मंडळी कुर्ता-पायजमा किंवा धोती-कुर्ता घालत नाहीत. राहुल गांधी यांचे टी-शर्ट घालणं हा आज कुठेतरी स्वत:ला सर्वसामान्य तरुणांशी जोडण्याचा प्रयत्न आहे.’

    तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद म्हणाले की,‘राहुल गांधी हे एक विलक्षण व्यक्तीमत्त्व आहे. आम्ही थंडी वाजत आहे म्हणून जॅकेट घातले आहे, तर ते फक्त टी-शर्ट घालून भारत जोडो यात्रेसाठी बाहेर जात आहेत. ते स्वतःची 'तपस्या' काळजीपूर्वक करणाऱ्या एखाद्या योगीसारखे आहेत.’

    वाचा -  Coronavirus : फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा! पर्यटनस्थळी वाढतोय धोका

    टी-शर्टमध्ये घालण्यामागे राजकारण?

    दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष सर्वसामान्यांशी जोडण्यासाठी कुठेतरी टी-शर्टच्या माध्यमातून राजकीय संदेश देत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) च्या 'लोकनीती' या संशोधन कार्यक्रमाचे सह-संचालक संजय कुमार म्हणाले, ‘राहुल गांधी हिवाळ्यात टी-शर्ट परिधान करत आहेत, यातून ते असा राजकीय संदेश देत आहेत की, ते सामान्य लोक, गरिबांसाठी काम करत आहेत. तसंच यातून असाही संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो की, गांधी हे गरीब आणि सामान्य लोकांसारखे कपडे घालतात.’

    कुमार पुढे म्हणाले, 'राहुल गांधींच्या 'इमेज मेकओव्हर'मध्ये त्यांचा संपूर्ण प्रवास कुठेतरी उपयुक्त दिसतो. हिवाळ्यात फक्त टी-शर्ट आणि पँट घालणं हादेखील या प्रयत्नाचा एक भाग असल्याचं दिसतं.’

    राहुल गांधी नेमकं काय म्हणतात?

    कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी यांच्या टी-शर्ट घालण्यावरून चर्चा सुरू असतानाच याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीही मत मांडलं आहे. दिल्लीमध्ये बोलताना ते म्हणाले की, ‘पत्रकारांनी मला विचारलं की तुम्हाला थंडी वाजत नाही का? पण हे लोक देशातील शेतकरी आणि गरिबांना का विचारत नाहीत? आम्ही 2800 किलोमीटर चालून काही मोठं काम केलं नाही. शेतकरी, मजूर रोजच पायी चालतात.’

    दरम्यान, कडाक्याच्या थंडीमध्ये राहुल गांधी यांच्या टी-शर्ट मधील लूकचे कौतुक होणं साहजिकच आहे. आता विरोधक याचा कसा सामना करतात, हे येत्या काळात दिसू शकते.

    First published:

    Tags: Bharat Jodo Yatra, Rahul gandhi