राहुल गांधी हे ब्राह्मण नाहीत तर 'हायब्रिड', भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी हे ब्राह्मण नाहीत तर 'हायब्रिड', भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

हेगडे यांनी या आधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वाद ओढवून घेतला होता. आता निवडणुका जवळ येत असल्याने प्रचाराची राळ उठणार आहे.

  • Share this:

सिरसी (कर्नाटक) 11 मार्च  : केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे हे कायम वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्यांवरून या आधीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. काँग्रेसचे अध्यक्ष हे ब्राह्मण नाहीत तर 'हायब्रिड' व्यक्ती आहेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. हेगडेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सिरसी इथं एका कार्यक्रमात बोलत असताना हेगडे म्हणाले, राहुल यांचे वडिल मुस्लिम होते. त्यांचे आजोबा हे पारसी होते, आई या ख्रिश्चन आहेत. असं असताना ते स्वत:ला जाणवं घालणारे हिंदू कसे म्हणवून घेतात? असा सवाल त्यांनी केला. ते ब्राम्हण आहेत यासाठी राहुल गांधी DNA टेस्ट करतील का असा सवालही त्यांनी केला.

हेगडे एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढं म्हणाले, राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी जेव्हा DNA चाचणी करण्याची वेळ आली तेव्हा सोनिया गांधी यांनी चाचणीसाठी राहुल यांचं नाही तर प्रियांका गांधी यांचं रक्त घेण्यासाठी सांगितलं होतं असंही ते म्हणाले. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी भारताच्या हवाई हल्ल्याचे पुरावे कसे मागत आहेत असंही ते म्हणाले.

हेगडे यांनी यांनी उधळलेल्या या वक्तव्यांमुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. हेगडे यांनी या आधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वाद ओढवून घेतला होता. आता निवडणुका जवळ येत असल्याने प्रचाराची राळ उठणार आहे. त्यामुळे या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोपाची पातळी आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उदयनराजेंनी उचलला शिवापूर दर्ग्यातला दगड, VIDEO व्हायरल

First published: March 11, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading