AIR STRIKE : मोदींनी राफेलचा मुद्दा काढताच राहुल गांधींनी केला पलटवार

AIR STRIKE : मोदींनी राफेलचा मुद्दा काढताच राहुल गांधींनी केला पलटवार

'राफेल विमानांना आणण्यास उशीर होण्याला नरेंद्र मोदीच कारणीभूत आहात,' असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मार्च : राफेल प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. 'प्रिय पंतप्रधान, तुम्हाला थोडीही लाज वाट नाही? तुम्ही 30 हजार कोटी रुपये चोरून तुमच्या मित्राला दिले. राफेल विमानांना आणण्यास उशीर होण्याला तुम्हीच कारणीभूत आहात,' असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना राफेलवरून काँग्रेसवर टीका केली होती. 'आज देशाला राफेलची कमतरता जाणवत आहे. राफेल असते तर निकाल अजून चांगले असते,' असं म्हणत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देताना राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

'राफेलला विलंब होण्यास पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यामुळेच अभिनंदन यांच्यासारख्या कमांडरला जुनी विमानं वापरून आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे,' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

काय आहे राफेल प्रकरण?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी कंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

VIDEO : शिवसेना राष्ट्रवादीत राडा, धनंजय मुंडेंचा पोलिसांवर गंभीर आरोप

First published: March 3, 2019, 8:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading