• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात
  • VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 05:00 PM IST | Updated On: Mar 27, 2019 05:00 PM IST

    नवी दिल्ली, 27 मार्च : दिल्लीच्या हुमायूँ रोडवर एका स्कूटरस्वाराला मागून आलेल्या एका गाडीनं धडक दिली. स्कूटरस्वार जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असतानाच तिथून राहुल गांधी यांचा ताफा जात होता. अपघात पाहून राहुल यांनी आपल्या ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा दिला. सगळा ताफा थांबला. जखमी स्कूटरस्वार पत्रकार राजेंद्र व्यास आहेत हे लक्षात आलं. राहुल गांधी यांनी स्वतःच्या गाडीतूनन त्यांना एम्स रुग्णालयात भरती केलं. स्वतःच्या रुमालाने व्यास यांच्या कपाळावरची जखम साफ करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी