नवी दिल्ली 2 जानेवारी : राफेल प्रकरणावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला भंडावून सोडलंय. बुधवारी लोकसभेत झालेल्या चर्चेतही त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूवरच त्यांनी शंका उपस्थितीत केली आणि जेपीसी मार्फेत चौकशीची मागणी केली. या चर्चेनंतरही ते शांत झालेले नाहीत. जेटलींच्या भाषणाचा हवाला देत राहुल गांधींनी सरकारवरच डाव उलटवण्याचा प्रयत्न केला.
चर्चेनंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा सरकारवर आरोपांची सरबत्ती केली. किंमत सांगणार नाही असं म्हणत असतानाच अरुण जेटलींनी स्वत:च किंमत सांगितली की या आधी 526 कोटींच असलेलं विमान 1600 कोटींना घेतलं गेलं. ही किंमत का वाढविली याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे.
मनोहर पर्रिकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल करत असून त्यांच्याकडे असलेल्या फाईल्समध्ये काय दडलं आहे हे जगाला कळलच पाहिजे. पंतप्रधान सर्वभ्रष्टाचारामध्ये सामील आहेत. चौकिदारच चोर आहे. आमचं सरकार आलं तर सर्व प्रकरणाची चौकशी करू. ही खरेदी करताना सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली.
पंतप्रधान कुठल्या जगात वावरत आहे ते त्यांना कळतं का? लोक त्यांना प्रश्न विचारत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या आक्षेपानंतरही का खेरेदी करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे.
लोकसभेतल्या चर्चेत काय म्हणाले राहुल?
राफेल प्रकरणावर सर्व देश पंतप्रधानांच्या भूमीकेवर संशय व्यक्त करतोय. त्यांनी एकाही प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं नाही.