News18 Lokmat

'शिवभक्त' राहुल गांधी शुक्रवारपासून कैलास यात्रेवर!

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारपासून (31 ऑगस्ट ) कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहेत.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 01:48 PM IST

'शिवभक्त' राहुल गांधी शुक्रवारपासून कैलास यात्रेवर!

नवी दिल्ली, ता. 29 ऑगस्ट : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारपासून (31 ऑगस्ट ) कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान त्यांनी याबाबतची घोषणा केली होती. तर अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनातही त्यांनी यात्रेची कार्यकर्त्यांना परवानगी मागितली होती. मी 15 दिवसांची सुट्टी घेणार आहे आणि कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. ते आपलं वचन राहुल पूर्ण करणार असून यात्रेवर निघणार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं भरकटलं होतं. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. याचा संदर्भ देत राहुल यांनी सांगितलं होतं की त्या घटनेनंतर माझ्या मनात मानसरोवर यात्रेला जाण्याची इच्छा झाली होती.


राहुल हे या यात्रेसाठी नेपाळ मार्गे न जाता चीनमार्गे जाणार आहेत. गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटीचा सपाटा लावला होता. त्यावरून वाद होताच. राहुल यांनी आपण शिवभक्त असल्याचं सांगितलं होतं.


आपण केवळ मंदिरातच नाही तर मशिद, गुरूद्वारा आणि चर्चमध्येही जातो असंही स्पष्ट केलं होतं. कैलास यात्रवरून परतल्यानंतर राहुल गांधी मध्यप्रदेशात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे. गेली दोन दिवस राहुल हे केरळच्या दौऱ्यावर होते.

Loading...


तिथे त्यांनी अनेक मदत छावण्यांमध्ये जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या आधी ते ब्रिटन आणि जर्मनीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वंयंसेवक संघावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांच्या मंदिर भेटी आणि कैलास यात्र ही भाजपच्या सॉफ्ट हिंदूंत्वाला उत्तर असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...