‘राहुल गांधी तुम्ही भारतीय असल्याचं सिद्ध करा’; गृह मंत्रालयाची नोटीस

‘राहुल गांधी तुम्ही भारतीय असल्याचं सिद्ध करा’; गृह मंत्रालयाची नोटीस

नागरिकत्वाच्या मुद्यावरून आता गृहमंत्रालयानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वावर काही सवाल केले. त्यानंतर आता गृहमंत्रालयानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवत तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करा असं म्हटलं आहे. सोमवारी सुब्रम्हण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल आणि शैक्षणिक पात्रतेबद्दल सवाल केले होते. शिवाय, स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तशी तक्रार देखील सादर केली होती. त्यानंतर आता गृहमंत्रालयानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता 15 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा दावा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी आपल्या पत्रात केला आहे. 21 सप्टेंबर 2017 ते 29 एप्रिल 2019 या काळात सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सतत गृहमंत्रालयाशी पत्रव्यवहार करत राहुल गांधी यांच्या नागरिकत्ववर प्रश्न विचारले आहेत.

‘ATS प्रमुख म्हणून हेमंत करकरेंची भूमिका अयोग्य’, आता सुमित्रा महाजनांचं वादग्रस्त विधान

नोटीसीवरून राजकारण नको

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून कोणतंही राजकारण नको. ही एक साधी प्रक्रिया आहे असं केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. निवडणुकीत उभा राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय हवा. त्यामुळे जुना पक्ष असलेल्या काँग्रेस अध्यक्षांना याबद्दल कोणताही आक्षेप नसावा असं नक्वी यांनी म्हटलं आहे. तसंच राहुल गांधींविरोधात उपस्थित केले गेलेले प्रश्न हे गंभीर आहेत. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टी राजकारणाशी जोडू नयेत असं देखील नक्वी यांनी म्हटलं आहे.

मसूद अझहर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता

काय आहे स्वामींचा आरोप

2003मध्ये ब्रिटनमध्ये बँकऑप्स नावानं कंपनी रजिस्टर झाली. यामध्ये राहुल गांधी यांचं नाव आहे. तर, पत्ता 51, साऊथगेट स्ट्रिट, विंचेस्टर, हैरपशायर S023 9EH असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे. 2006मध्ये जी रिटर्न फाईल करण्यात आली होती. त्यामध्ये राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक आहेत असा उल्लेख असल्याचं सुब्रम्हण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

First published: April 30, 2019, 12:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading