राहुल गांधींनी ट्विटरवरून नावासमोरचं 'काँग्रेस अध्यक्ष'पद काढून टाकलं

राहुल गांधींनी ट्विटरवरून नावासमोरचं 'काँग्रेस अध्यक्ष'पद काढून टाकलं

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून 'काँग्रेस अध्यक्ष' ही ओळख काढून टाकली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जुलै : राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून 'काँग्रेस अध्यक्ष' ही ओळख काढून टाकली आहे. यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलं  की, "मी अगोदरच काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसच्या कार्यकारिणीनं लवकरात लवकर नवा अध्यक्ष ठरवण्यासाठी बैठक घ्यावी." काँग्रेसच्या राजकारणाची पुढची दिशा काय असेल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा दिल्याचं राहुल यांनी तेव्हा सांगितलं होतं.

(वाचा : 'मी काही आता पक्षप्रमुख नाही, काँग्रेसने लवकर नवा अध्यक्ष निवडावा')

(वाचा : काँग्रेसचं अध्यक्षपद : हे माजी मुख्यमंत्री आता हंगामी अध्यक्ष)

दरम्यान, राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यापूर्वी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. पण आता या निवडीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. एका इंग्रजी चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, जोपर्यंत नव्या अध्यक्षांच्या नावावर सहमती होत नाही तोपर्यंत मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष असतील. मोतीलाल व्होरा हे 91 वर्षांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. याआधी सोनिया गांधींनी सुशीलकुमार शिंदेंना अध्यक्षपदासाठी फोन केल्याची बातमी होती. अध्यक्षपदाच्या यादीत सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव अशी नावं होती. पण आता सुशीलकुमार शिंदे यांचं नावही वेटिंग लिस्टमध्येच गेल्याचं दिसतं आहे.

(वाचा :मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!)

राहुल गांधी निर्णयावर ठाम

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या त्यांच्या बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचं समजतं. पण गांधी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतं. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार करून अध्यक्षपदी राहण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं.

VIDEO: मी सर्वात नालायक आमदार', खडसेंच्या भाषणाने सत्ताधारी गोटात खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या