राहुल गांधींनी बदललं ट्विटर हँडल, आता सर्च करणं झालं सोपं

राहुल गांधींनी बदललं ट्विटर हँडल, आता सर्च करणं झालं सोपं

राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलचं नाव बदललंय. अगोदर @OfficeOfRG होतं, आता ते @RahulGandhi झालंय.

  • Share this:

17 मार्च : राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलचं नाव बदललंय. अगोदर  @OfficeOfRG होतं, आता ते @RahulGandhi झालंय. ही माहिती काँग्रेसच्या सोशल मीडिया सेल प्रमुख दिव्या स्पंदना उर्फ राम्यानं दिलीय.

ट्विटरचा पत्ता बदलल्याचं राहुल गांधींनी ट्विट करून सांगितलं. ते म्हणाले, ' शनिवारी सकाळी 9 वाजता माझं ट्विटर हँडल बदलून @RahulGandhi असं झालंय. @OfficeOfRG हे अकाऊंट बंद करण्यात आलंय. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. सोशल मीडियाच्या प्लॅटफाॅर्मवरून मी तुमच्याशी संवाद साधेन. '

@officeofRG हे त्यांचं ट्विटर हँडल 'यूजर फ्रेंडली' नसल्याचं अनेक जाणकारांचं मत होतं. त्याऐवजी अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे थेट नावाचं ट्विटर हँडल त्यांनी घ्यावं, अशी सूचना अनेकांनी केली होती. अखेर, ती राहुल यांनी स्वीकारलीय. ट्विटर हँडलच्या नावासोबतच त्यांनी आपला फोटोही बदलला आहे.

First published: March 17, 2018, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading