पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल-हार्दिकचं एकमत

पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल-हार्दिकचं एकमत

पाटीदार समाजाच्या सगळ्या मागण्या काँग्रेसने मान्य केलं असल्याची माहिती हार्दिक पटेलने दिली आहे. पाटीदारांना ओबीसींइतकच आरक्षण द्यायचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 22 नोव्हेंबर: पाटीदार  आरक्षणाच्या मुद्द्यावर  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल यांचं एकमत झालं असल्याची माहिती आज हार्दिक पटेलने दिली आहे. तो पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यामुळे आता काँग्रेससोबत हार्दिक पटेल जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाटीदार समाजाच्या सगळ्या मागण्या  काँग्रेसने मान्य केलं असल्याची माहिती हार्दिक पटेलने दिली आहे. पाटीदारांना ओबीसींइतकच आरक्षण द्यायचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. तसंच काँग्रेस एक  आयोगही स्थापन करणार आहे. तसंच भाजपशी लढाई करणं गरजेचं असल्याचंही हार्दिक म्हणाला. पण काँग्रेससोबत युती करण्याबाबत काही स्पष्ट ग्वाही त्याने दिली नाही.  गुजरातमध्ये 8 आणि 13 डिसेंबरल

त्यामुळे आता हार्दिक पटेल आणि पाटीदार समाज काँग्रेससोबत उभा राहतो का आणि तसंच याचा गुजरातच्या  निवडणुकांवर परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 22, 2017, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading