राहुल गांधींनी भरला काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा अर्ज

राहुल गांधींनी भरला काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा अर्ज

जर दुसरा अर्ज दाखल झाला नाही तर, पक्षाचे निवडणूक प्राधिकरण ५ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर करू शकतं. राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा अर्ज दाखल होण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे.

  • Share this:

 04 डिसेंबर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी  यांनी आज पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

जर दुसरा अर्ज दाखल झाला नाही तर, पक्षाचे निवडणूक प्राधिकरण ५ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर करू शकतं.

आज सकाळी 10.30च्या सुमाारास त्यांनी अर्ज दाखल केला आहे.  ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात हा अर्ज भरला आहे. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह  आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या.

राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा अर्ज दाखल होण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज दुपारनंतरच चित्र स्पष्ट होईल, असं दिसतंय. दरम्यान  उद्याच राहुल गांधी गुजरातकडे रवाना होतील. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ९ डिसेंबरला होणार आहे. प्रचाराची मुदत संपेपर्यंत ते गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. ते ५ ते ७ डिसेंबरपर्यंत सभा आणि रोड शोद्वारे प्रचार करणार आहेत.

गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे तर 19 डिसेंबर पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

 

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया

- अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

- अर्जांची छाननी - 5 डिसेंबर

- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 11 डिसेंबर

- मतदानाची तारीख (गरज असल्यास) - 16 डिसेंबर

- मतदानाचा निकाल - 19 डिसेंबर

First published: December 4, 2017, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading