राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मारला डोळा, VIDEO व्हायरल

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मारला डोळा, VIDEO व्हायरल

भोपाळमध्ये सुरू असलेल्या रोड शोमध्ये एका ठिकाणी चाहा पीत असताना राहुल यांनी कार्यकर्त्यांकडे पाहत पुन्हा एकदा डोळा मारला. राहुल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

भोपाल, ता. 17 सप्टेंबर : काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधीचा आज भोपाळमध्ये रोड शो होता. या रोड शोमध्ये एका ठिकाणी चाहा पीत असताना राहुल यांनी कार्यकर्त्यांकडे पाहत पुन्हा एकदा डोळा मारला. राहुल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर राहुल गांधीच्या डोळा मारण्यावर चर्चा सुरू झालीय. मध्यप्रदेशातल्या विधानसभेच्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असतानाच काँग्रेसे प्रचाराला सुरूवात केलीय. याच प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो भोपाळमध्ये आयोजित करण्यात आला होता.

रोड शो जेव्हा जुन्या भोपाळ शहरात आला तेव्हा राहुल आणि सोबतची नेते मंडळी चहाच्या एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबली. चहा आणि बटाटेवडा खात असतानाच राहुल गांधींना पाहण्यासाठी तिथं कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. चहांचे घोट घेत बटाटेवड्यांचा आनंद घेत असतानाच राहुल कार्यकर्त्यांकडे पाहून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत होते.

हे करत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा डोळा मारला आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते कमलनाथ, जोतिरादित्य शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

मोदी सरकारविरूद्ध विरोधीपक्षांनी मांडलेल्या अविश्वास  प्रस्तावादरम्यान राहुल गांधींनी जोरदार भाषण केलं आणि भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसनाजवळ जावून त्यांना मिठी मारली आणि नंतर आपल्या जागी बसल्यानंतर त्यांनी डोळा मारला. त्यांच्या या डोळा मारण्यावरून देशभर चर्चा झाली.

राहुल यांची ही कृती बालीशपणाची असून ज मिठीने कमावले ते डोळ्याने गमावले अशी टीका त्यावर केली गेली. आता पुन्हा एकदा त्यांनी डोळा मारल्याने त्यांना आणखी टीका सहन करावी लागणार आहे.

First published: September 17, 2018, 7:58 PM IST

ताज्या बातम्या