अवनी वाघीण वाद पेटला, मेनका गांधींनंतर आता राहुलचंही ट्विट

राहुल गांधींनी महात्मा गांधीचा विचार ट्विटमध्ये लिहिलाय. ते लिहितात, ' देशातल्या प्राण्यांना कशी वागणूक मिळते, यावरून त्या देशाचा मोठेपणा सिद्ध होतो. - महात्मा गांधी'

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2018 11:08 AM IST

अवनी वाघीण वाद पेटला, मेनका गांधींनंतर आता राहुलचंही ट्विट

मुंबई, 5 नोव्हेंबर : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. पण, अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केलाय.अनेक उलटसुलट चर्चा यावर झाल्या. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करून अवनीच्या मृत्यूचा निषेध केलाय.


राहुल गांधींनी महात्मा गांधीचा विचार ट्विटमध्ये लिहिलाय. ते लिहितात, ' देशातल्या प्राण्यांना कशी वागणूक मिळते, यावरून त्या देशाचा मोठेपणा सिद्ध होतो. - महात्मा गांधी' . यावरूनच अवनीला मारण्याबद्दलची राहुल गांधींची नाराजी व्यक्त होतेय.



Loading...




चंद्रपुरातील अवनी ही वाघीण नरभक्षक आहे, असं सांगून या वाघिणीला ठार केल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.


‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.


या क्रूर हत्यने दोन बछड्यांना अनाथ केलं आहे, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची भीषणता अधोरेखित केली. मनेका गांधी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय उत्तर देणार, हे पाहावं लागेल.


वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही, कोट्यवधी रुपये वाया गेले, असाही आरोप वन्यप्रेमींनी केलाय. तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील. पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फारेंसिक अहवालसु्द्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केलीय.


VIDEO : दोन भल्यामोठ्या अजगरांचा थरार कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...