'मी मोदींचा द्वेष करत नाही', राहुल गांधींची News 18 ला खास मुलाखत

'मी मोदींचा द्वेष करत नाही', राहुल गांधींची News 18 ला खास मुलाखत

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. केरळमधल्या वायनाडचं मतदान आधीच झालं आणि आता 6 मे ला अमेठीमध्ये मतदान आहे. न्यूज-18 च्या प्रतिनिधींनी अमेठीमध्ये राहुल गांधींची खास मुलाखत घेतली.

  • Share this:

अमेठी, 4 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. केरळमधल्या वायनाडचं मतदान आधीच झालं आणि आता 6 मे ला अमेठीमध्ये मतदान आहे. न्यूज-18 च्या प्रतिनिधींनी अमेठीमध्ये राहुल गांधींची खास मुलाखत घेतली.

मी कुणाचा द्वेष करत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात राग किंवा द्वेष नाही, असं राहुल गांधी म्हणाले. मोदींसारखे विचार असणाऱ्या लोकांचाही मी द्वेष करत नाही पण मोदींच्या विचारापासून मला देशाला वाचवायचं आहे, असंही ते म्हणाले.

नोटबंदी हा सर्वात वाईट निर्णय

नोटबंदी हा मोदी सरकारने घेतलेला सर्वात वाईट निर्णय होता, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली. मी या निवडणुकीच्या हंगामात एक युद्ध लढतो आहे, असंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्याबद्दलच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली. या दोन्ही नेत्यांबदद्ल माझ्या मनात सन्मान आहे. अखिलेश माझा जवळचा मित्र आहे,असं त्यांनी सांगितलं.

अमेठीमध्ये 6 मे ला मतदान

अमेठीमध्ये 6 मे ला मतदान होणार आहे. यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. त्यामुळे राहुल गांधींनी इथे रोड शो आणि सभांच्या माध्यमातून प्रचार केला. मागच्या पाच वर्षांत माझ्यावर वैयक्तिक हल्ले झाले. पण या वैयक्तिक हल्ल्यांनीच मला आणखी कणखर केलं, असं त्यांनी सांगितलं.

सगळ्यात प्रभावी आणि कणखर नेता कोण यावर ते म्हणाले, जो आपल्या चुका स्वीकारतो तोच कणखर प्रभावी नेता असतो. नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं पण ही आपली चूक होती हे त्यांनी मान्य करायला हवं.

राफेल व्यवहारात घोटाळा

राफेलच्या खरेदी व्यवहारात घोटाळा झाला याबद्दल कोणतीही शंका नाही. राष्ट्रीय सुरक्षा हा एक मुद्दा आहे पण त्यासोबतच आणखीही मुद्द्यांकडे आपण लक्ष द्यायला हव, अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली.

मसूद अझहरला कुणी जाऊ दिलं ?

जैश ए मोहम्मद चा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं पण दहशतवादाच्या विरोधात तीव्र कारवाई व्हायला हवा. मसूद अझहरला त्यावेळच्या भाजप सरकारनेच पाकिस्तानला पोहोचवलं होतं, असा आरोप त्यांनी केला.

============================================================================

Rahul Gandhi EXCLUSIVE, 'मोदींबाबत माझ्या मनात राग नाही'

First published: May 4, 2019, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading