मराठी बातम्या /बातम्या /देश /

'हां, हां दुर्योधन!...' काँग्रेस आंदोलनात राहुल गांधींची 'आजी' स्टाईल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

'हां, हां दुर्योधन!...' काँग्रेस आंदोलनात राहुल गांधींची 'आजी' स्टाईल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

नॅशनल हेराल्ड केसमध्ये (National Herald ED) आज पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची चौकशी केली जात आहे. याविरोधात धरणं आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अन्य काँग्रेस खासदारांना पोलिसांनी विजय चौकातून ताब्यात घेतलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 26 जुलै : नॅशनल हेराल्ड केसमध्ये (National Herald ED) आज पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची चौकशी केली जात आहे. याविरोधात धरणं आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अन्य काँग्रेस खासदारांना पोलिसांनी विजय चौकातून ताब्यात घेतलं आहे. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी त्यांची आजी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यासारखंच रस्त्यावर बसून आंदोलन केलं. काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती भवनाकडे आंदोलन घेऊन जात असल्याचं सांगत पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं. आम्हाला आंदोलन करून दिलं जात नाही, इकडे पोलीस राज आहे. हे भारताचं सत्य आहे. मोदी जी राजा आहेत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली. राहुल गांधी आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना पोलीस बसमध्ये घेऊन निघून गेले. या सगळ्यांना नेमकं कुठे नेण्यात आलं, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसने एक फोटो आणि कविता ट्वीट केली आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी रस्त्यावर बसले आहेत. तसंच या ट्वीटमध्ये काँग्रेसने इंदिरा गांधींचा जुना फोटोही ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये इंदिरा गांधीही जमिनीवर बसलेल्या दिसत आहेत. या फोटोच्या माध्यमातून काँग्रेसने राहुल गांधींना इंदिरा गांधींप्रमाणेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने केंद्र सरकारवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी काँग्रेस आज राष्ट्रपती भवनावर मोर्चा घेऊन जाणार होती. या मोर्चासाठी काँग्रेस नेते ऐतिहासिक विजय चौकात एकत्र आले. विजय चौकात धरणं दिल्यानंतर मार्चला सुरूवात होणार, त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'काँग्रेस खासदारांना विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च काढण्यापासून रोखण्यात आलं. त्यांना जबरदस्ती ताब्यात घेण्यात आलं. आता आम्ही पोलिसांच्या बसमध्ये आहोत. आम्हाला कुठे घेऊन जात आहेत, हे फक्त पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना माहिती आहे,' असं जयराम रमेश म्हणाले. पोलीस कॅम्पमध्येच बैठक काँग्रेस नेत्यांनी किंग्सवे कॅम्प दिल्लीला काँग्रेस संसदीय दलाच्या विचार-मंथन सत्रामध्ये परिवर्तित केलं. यावेळी राहुल गांधी यांच्यासह इतर नेते पोलिसांच्या ताब्यात असतानाच महागाई, अग्नीपथ, खाद्य पदार्थांवर जीएसटी, राष्ट्रीय सुरक्षा, पडणारा रुपया आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करताना दिसले. सोनिया गांधींची दुसऱ्यांदा चौकशी काँग्रेस खासदार याआधी पार्टीची रणनिती ठरवण्यासाठी संसदेत एकत्र आले होते. ईडीकडून आज दुसऱ्यांदा नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी राहुल गांधींची आधीच चौकशी झाली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rahul gandhi

    पुढील बातम्या