'राफेल प्रकरणाच्या फाईल्स मनोहर पर्रिकरांकडे'

राफेल विमान खरेदीमध्ये माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या चौकशीची मागणी आता राहुल गांधी यांनी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 08:51 AM IST

'राफेल प्रकरणाच्या फाईल्स मनोहर पर्रिकरांकडे'

पणजी, 9 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणाच्या चौकशीची सुरूवात मनोहर पर्रिकर यांंच्यापासून करा अशी मागणी केली आहे. मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना राफेल करार झाला. त्यानंतर त्यांनी राफेल प्रकरणाच्या फाईल्स माझ्याकडे आहेत असा दावा केला होता. अशा शब्दात राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकर यांच्यावर निशाणा साधला. पणजी येथे बोलत असताना त्यांना राफेल प्रकरणावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं.

यापूर्वी मनोहर पर्रिकर यांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. त्यामध्ये पर्रिकर राफेल प्रकरणावर बोलत होते. पण, पर्रिकरांनी मात्र ती क्लिप आपली नसल्याचा दावा केला होता.

दरम्यान, अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी सर्वोच्च न्यायालयात राफेल प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती दिली होती. त्यावर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या असल्यानं राफेल प्रकरणावरून सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांनी सुरू केला आहे.


 टिकटिक...मनसे लोकसभेचं 'टायमिंग' साधणार की विधानसभेचं?


Loading...अॅटर्नी जनरल यांची पलटी

राफेल विमानांची कागदपत्रं चोरीला गेली, असं वक्तव्य अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी केलं होतं. त्यानंतर एकच गदारोळ झाला पण आता मात्र त्यांनी राफेलबद्दल वेगळाच दावा केला. ही कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेलीच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

राफेल प्रकरणी याचिकाकर्त्यांनी मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपीज वापरल्या आणि त्यामुळे कार्यालयीन गुप्ततेचा भंग झाला, असं मी सुप्रीम कोर्टाला सांगितलं, असा दावा वेणूगोपाल यांनी केला. शुक्रवारी त्यांनी याबाबतचं विधान केलं.


मोदींच्या चौकशीची मागणी

राफेल प्रकरणामध्ये मोठा घोटाळा आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल. शिवाय, मोदी देखील दोषी आढळतील असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केला होता.


सचिनचा भावुक करणारा VIDEO, आईसाठी बनवलं वांग्याचं भरीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...