पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी नृत्य करत होते, भाजपने केला PHOTO VIRAL

पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी नृत्य करत होते, भाजपने केला PHOTO VIRAL

'निवडणुका जवळ आल्याने भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना भान ठेवलं पाहिजे.'

  • Share this:

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याला अजुन आठवडाही झाला नाही तोच आता त्यावरून राजकारणाला सुरूवात झालीय. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो शुट करत होते असा आरोप काँग्रेसने काल केला होता. त्यानंतर भाजपकडून आज राहुल गांधी यांचा एका फोटो व्हायरल करण्यात आला आहे. त्या फोटोत राहुल गांधी एका लोकनृत्यात सहभागी झाल्याचं दिसत आहे. त्यावर भाजपने काँग्रेसवर टीका केलीय.


भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेसने केलेल्या एका ट्विटचा फोटो व्हायरल केला. या फोटोत राहुल गांधी लोकनृत्यात सहभागी झाले आहेत. 19 फेब्रुवारीचा हा फोटो असून तो काँग्रेसने ट्विट केला होता. नंतर ते ट्विट काँग्रेसने डिलीट केलं होतं. हा फोटो का डिलीट करण्यात आला असा सवाल अमित मालवीय यांनी केला आहे.
गुजरातमधल्या बलसाड इथं काँग्रेसची जनआक्रोश रॅली होती त्यानंतर तिथल्या आदिवासी लोकांसोबत राहुल गांधी पारंपरिक नृत्य करत होते.पुलवामा हल्ल्याचं राजकारण करू नये असं आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत होतं मात्र काही दिवसातच राजकारणाला सुरुवात झाली आहे. निवडणुका जवळ आल्याने भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना भान ठेवलं पाहिजे अशी भावना सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या