News18 Lokmat

अभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी

राफेल च्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले अभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2018 03:32 PM IST

अभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी

अमेठी, ता. 25 सप्टेंबर : राफेल प्रकरणावर काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका कायम आहे. राहुल सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. तिथे कार्यकर्त्यांसमोर बोलतानाही त्यांनी राफेल च्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले अभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी राफेल विमानाच्या खरेदीच्या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना त्यांनी यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच टार्गेट असतील असे संकेत दिले. ते म्हणाले सध्या जे काय सुरू आहे ते तुमच्यासमोर आहे. पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये आणखी अनेक गोष्टी बाहेर येतील. आम्ही सरकारला सोडणार नाही.

भ्रष्टाचाराला संपवण्याची घोषणा करून जे सत्तेत आले त्यांनीच भ्रष्टाचार केला. एका खासगी कंपनीचा 30 हजार कोटींचा फायदा केला. राफेल, विजय मल्ल्या,ललित मोदी, मोटबंदी,गब्बर सिंग टॅक्स, ही सर्व कामं नरेंद्र मोदींनी केली आहेत आणि त्या सर्व कामांमध्यो चोरी झाली आहे. नरेंद्र मोदी हे चौकीदार नाही तर चोर आहेत हे आम्ही दाखवून देवू.

देशाची चौकीदारी करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांनी चोरी का केली याचं देशाला उत्तरं पाहिजे असंही ते म्हणाले. राफेल प्रकरणात जर काहीच झालं नाही तर प्रकणाची चौकशी सरकार का करत नाही असा सवालही त्यांनी केला.

VIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...