नरेंद्र मोदी 'डरपोक', माझ्या समोर ते 10 मिनिटेही टिकणार नाहीत - राहुल गांधी

नरेंद्र मोदी 'डरपोक', माझ्या समोर ते 10 मिनिटेही टिकणार नाहीत - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या भाषणात टार्गेट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी :  निवडणुका जशा जवळ येताहेत तसा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा जोश वाढतोय. गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. पंतप्रधन मोदी हे डरपोक नेते आहेत असा आरोप त्यांन केला. मोदींनी देशाची वाट लावली असंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या भाषणात टार्गेट केलं. मोदींना कुठलंही धोरण नाही, नोटबंदी लावून त्यांनी गरीबांना रांगेत उभे केलं. रोजगार हिरावून घेतला.

ते प्रमाणिक नसल्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकत नाही अशी टीका त्यांनी केली. मोदींना माझ्य समोर चर्चेला आणलं तर ते 10 मिनिटेही बोलू शकणार नाहीत. स्टेजवरून पळून जातील असंही ते म्हणाले.

तर तिहेरी तलाक रद्द करू

काँग्रेस सत्तेत आली तिहेरी तलाक कायदा रद्द करू अशी ग्वाही गुरुवारी काँग्रेसे दिली. दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या परिषदेत महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी ही ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर राहुल गांधीही उपस्थित होते.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत 28 डिसेंबरला पुन्हा एकदा मंजूर झालं. आधीच्या विधेयकात काही सुधारणा करून हे विधेयक आज मांडण्यात आलं होत. त्यावर दिवसभर चर्चा झाली आणि नंतर मतदान घेण्यात आलं. विधेयकाच्या बाजूने 245 मतं पडली तर 11 जणांनी विधेयकाला विरोध केला. काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला. या विधेयकाचं स्वरूप हे योग्य नाही अनेक जाचक तरतूदी आहेत अशी भूमिका काँग्रेसची होती. काँग्रेस आणि एआयडीएमकेने मतदानात सहभाग न घेता सभात्याग केला. एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मांडलेल्या सूचना फेटाळण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading