S M L

लोकसभेत आमच्यासमोर 15 मिनिटंही मोदी टिकणार नाही- राहुल गांधी !

राहुल गांधींनी राफेल ,नोटाबंदी सकट सगळ्याच मुद्द्यांवर टीका केली आहे. अमेठीत मोठ्या जनसमुदायाला ते संबोधित करत होते

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 17, 2018 02:55 PM IST

लोकसभेत आमच्यासमोर 15 मिनिटंही मोदी टिकणार नाही- राहुल गांधी !

17 एप्रिल : लोकसभेत जर आम्हाला संधी दिली तर मोदी आमच्यासमोर 15 मिनिटही टिकणार नाही  अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधींनी राफेल ,नोटाबंदी सकट सगळ्याच मुद्द्यांवर टीका केली आहे. अमेठीत मोठ्या जनसमुदायाला ते संबोधित करत होते. तसंच गरिबांचे पैसे मोदींनी नीरव मोदींच्या खिशात टाकले असा सनसनाटी आरोपही त्यांनी लावला.   फक्त 15 लोकांचे अच्छे दिन आले बाकी कुणाचे अच्छे दिन आले नाही अशा शब्दात त्यांनी सरकारला फटकारलं आहे.

याचवेळी एका विद्यार्थिनीने  राहुल गांधींना विचारले की अमेठीचा विकास का झालेला नाही. तर  त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की अमेठी योगी आदित्यनाथ चालवत आहे. त्याचा माझ्याशी संबंध येत नाही.   अ जूनही विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला .

आता राहुल गांधी हे मजेत बोलत होते की खरोखर टीका करत होते  हे काही कळू शकलेले नाही.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close