काँग्रेस हिंदू मतांसाठी आटापिटा करतंय-गुजरात फकिर समाजाच्या अध्यक्षांची टीका

गुजरातच्या सोमनाथ शहरात ५८ हजार मुस्लिम मतदार आहेत. तर १ लाखांपेक्षा मुस्लिमांची लोकसंख्या आहे. असं असतानाही आपल्याला राजकारणात स्थान दिलं जात नाही अशी खदखद इथल्या मुस्लिमांच्या मनात आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2017 11:00 PM IST

काँग्रेस हिंदू मतांसाठी आटापिटा करतंय-गुजरात फकिर समाजाच्या अध्यक्षांची टीका

30 नोव्हेंबर: काँग्रेस हिंदु मतांसाठी आटापिटा करतंय अशी टीका  गुजरात फकीर समाजाचे अध्यक्ष आनिकभाई यांनी केली आहे. तसंच आमच्याकडे सगळेच दुर्लक्ष करत आहेत असंही ते म्हणाले.

गुजरातच्या सोमनाथ शहरात ५८ हजार  मुस्लिम मतदार आहेत. तर १ लाखांपेक्षा मुस्लिमांची लोकसंख्या आहे. असं असतानाही आपल्याला राजकारणात स्थान दिलं जात नाही अशी खदखद इथल्या मुस्लिमांच्या मनात आहे. भाजप तर आम्हाला विचारतच नाही पण काॅंग्रेसही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीयं अशी या समाजाची तक्रार आहे. राहूल गांधींची सोमनाथ मंदिरात काल अहिंदू म्हणून नोंद झाली होती. त्यानंतर याबाबतीत प्रचंड  टीका झाली. मग काँग्रेसच् प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी  राहुल गांधी जानवेधारी हिंदू असल्याचा खुलासा केला होता. तसंच ते हिंदू धर्माचं पालन करतात असंही त्यांनी सांगितलं होतं.

हा खुलासा म्हणजे काँग्रेसनंही हिंदुंच्या मतांसाठी केलेला आटापिटा आहे अशी टीकाही गुजरात फकिर समाजाचे अध्यक्ष आनिकभाई यांनी केली आहे. आमच्या मुलभूत प्रश्नांकडे कोणाचंच लक्ष नाहीये असा आरोप इथले मुस्लिम करत आहेत.

 

तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी आपलाी मंदिर वारी सुरूच ठेवली आहे.  त्यांनी आज बोटाड इथं स्वामी नारायण इथल्या मंदीराला भेट दिली  आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांपैकी ५४ जागा असलेल्या सौराष्ट्र आणि कच्छ भाग राहूल गांधी सध्या पिंजून काढत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 11:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...