देश लुटला जात असताना 'चौकीदारा'चं मात्र मौन - राहुल गांधींचा हल्लाबोल

देश लुटला जात असताना 'चौकीदारा'चं मात्र मौन - राहुल गांधींचा हल्लाबोल

देश लुटला जात असताना देशाचे चौकीदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही काढत नाही असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 एप्रिल : देश लुटला जात असताना देशाचे चौकीदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही काढत नाही असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. नवी दिल्लीत काँग्रेसच्या वतीनं केंद्राच्या विरोधात आयोजित जन आक्रोश रॅलीत ते बोलत होते. या भाषणातही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या रॅलीत माजी पंप्रधान मनमोहनसिंग, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते.

राहुल गांधींच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे

- नीरव मोदी देशातला पैसा लुटून नेत असताना मोदींनी काय केलं तर काहीच नाही

- केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी भ्रष्टाचार केला, अमित शहांच्या मुलानं भ्रष्टाचार केला तरी मोदीचं मौन आहे.

- भाजपच्या आमदाराने आणि कार्यकर्त्यांनी महिलांवर अत्याचार केले तरही पंतप्रधान मौन आहेत.

- कुठलाही अजेंडा नसताना नरेंद्र मोदी चीनमध्ये जातात आणि चर्चा करतात तर डोकलाममध्ये चीन कुरापती करतो आहे.

- गेल्या 70 वर्षात मी असा पंतप्रधान पाहिला नाही

- देशातल्या प्रत्येक घटनात्मक संस्थेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय.

सोनिया गांधी

- समाजात फुट पाडण्याचं विभाजनाचं काम सरकार करत आहे.

- देशातलं एकात्मतेचं वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे

- सरकारला समाजात एकोपा नको आहे

मनमोहनसिंग

- नरेंद्र मोदींनी आपलं एकही आश्वासन पाळलं नाही

- रोजगार नाही, पैसे नाही काहीच नाही, फक्त पोकळ आश्वासनं दिली जात आहेत

- कुछ ऐसे भी मंजर हैं तारीख की नज़रों में

लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पायी

First published: April 29, 2018, 12:48 PM IST

ताज्या बातम्या