S M L

अमित शहांनी राहुल गांधींबद्दल व्हॉट्सअ‍ॅपवर काय वाचलं?

अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

Updated On: Mar 31, 2019 03:07 PM IST

अमित शहांनी राहुल गांधींबद्दल व्हॉट्सअ‍ॅपवर काय वाचलं?

नवी दिल्ली, 31 मार्च : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलं. राहुल गांधी वायनाडमधून देखील निवडणूक लढणार आहेत. यावर एका जाहीर सभेदरम्यान बोलताना अमित शहा म्हणाले की, मी व्हॉट्सअ‍ॅपवर राहुल गांधी वायनाड या ठिकाणीहून देखील लढणार असल्याचं वाचलं. त्यांना केरळमधून का लढावं लागत आहे? राहुल गांधी यांनी अमेठीसाठी काय केलं हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना वायनाड या ठिकाणीहून लढायचं आहे. असा शब्दात अमित शहा यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं.




Loading...

कुठून लढणार राहुल गांधी?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश आणि केरळ या दोन राज्यातील मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते ए.के.एन्टनी यांनी दिली. राहुल गांधी अमेठीसोबतच वायनाड येथूनही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीदेखील यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागा लढवणार आहे.

केरळमधली वायनाडची जागा सध्या रिक्त आहे. 2014 मध्ये निवडून आलेले खासदार एम. एल. शहनवाझ यांचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं. त्यामुळे वायनाडच्या जागेवर कोणीही उमेदवार नव्हता. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी वायनाडमधून राहुल यांनीच निवडणूक लढावी यासाठी आग्रह धरला होता. अखेर राहुल गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.


पुलवामा हल्ला हा मोदींना जैशने दिलेली भेट, माजी रॉ प्रमुखांचे खळबळजनक वक्तव्य


काय आहे वायनडचं महत्त्व

राहुल गांधी यांनी कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून निवडणूक लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावर, 'मला त्यांच्या राज्यातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे', असं राहुल गांधींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन वायनाडमधून निवडणूक लढवण्याला होकार दिला. वायनाड मतदार संघाची निवड करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, हा मतदारसंघ केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडतो. दक्षिणेतील तीन राज्यांचं त्रिकोण असलेल्या या मतदारसंघाची निवड केल्यामुळे तिन्ही राज्यातील कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण झाली आहे.


VIDEO: 'मी जे सांगतो तेच करतो, आणि जे करतो तेच बोलतो'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 03:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close