आम्ही लोकांचा विश्वास परत मिळवू; निकालाच्या2 दिवसांनंतर राहुल गांधी बोलले

आम्ही लोकांचा विश्वास परत मिळवू;  निकालाच्या2 दिवसांनंतर राहुल गांधी बोलले

शनिवारी इशान्य भारतातल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड या तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात त्रिपुरात काँग्रेसला आपलं खातंही उघडता आलं नाही तर नागालॅंडमध्ये सरळ पराभवाचा सामना करावा लागला.

  • Share this:

05 मार्च: त्रिपुरा ,मेघालय  आणि नागालॅंडचे निकाल जाहीर झाल्याच्या दोन दिवसांनंतर काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी निकालावरचं आपलं मौन सोडलं आहे.जनमताचा आपण आदर करत असून त्यांचा विश्वास आपण परत मिळवू असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

शनिवारी इशान्य भारतातल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड या तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात त्रिपुरात काँग्रेसला आपलं खातंही उघडता आलं नाही तर नागालॅंडमध्ये सरळ पराभवाचा सामना करावा लागला. मेघालयमध्ये कांग्रेसला 2013 साली 29 जागा मिळाल्या होत्या यंदा मात्र 21च जागा मिळाल्या आणि तरीही

काँग्रेसला सत्ता काही स्थापन करता आली नाही. थोडक्यात नागालॅंड मेघालयमधील सत्ता काँग्रेस गमावून बसलं. या दोन्ही राज्यांमध्ये राहुल गांधीनी   प्रचार केला होता. निकालाच्या दिवशी आपल्या 93वर्षाच्या आजारी आजीला भेटायला राहुल गांधी इटलीला गेले होते. पण  आतामात्र त्यांनी आज आपलं मत व्यक्त केलं. तसंच लोकांचा विश्वास परत जिंकू हा विश्वासही दाखवला.

आता येत्या काळात कर्नाटक, राजस्थान,मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. त्यांना राहुल गांधी कसे सामोरे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: March 5, 2018, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading