नवी दिल्ली, 3 जानेवारी : नवीन शेती कायद्याविरोधात (New Farm Laws) शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेतकरी आंदोलनावरून पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. चंपारण्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी दिल्ली सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांची तुलना 'सत्याग्रह्यांशी' केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी त्यांचा हक्क सरकारकडून नक्की घेतील.
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं की, देश पुन्हा एकदा चंपारण्यासारख्या शोकांतिकेचा सामना करीत आहे. तेव्हा ब्रिटीश कंपनी शूर होती, आता मोदी-मित्रांची कंपनी शूर आहे. पण चळवळीतील प्रत्येक शेतकरी-कामगार हा सत्याग्रही आहे जो आपला हक्क घेईलच.
राजकीय विरोधाची पद्धत सत्याग्रह
'सत्याग्रह' हा सरकारच्या धोरणाविरोधात राजकीय विरोध करण्याची पद्धत आहे. ब्रिटीश सरकारविरोधात महात्मा गांधी यांनाही सत्याग्रहाच्या पद्धतीचा अवलंब केला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनात 1917 मध्ये महात्मा गांधींनी बिहारमधील चंपारण्यात सत्याग्रह केला होता. जेव्हा शेतकऱ्याकडून नीळेची शेती करण्याविरोधात आंदोलन केलं होतं.
देश एक बार फिर चंपारन जैसी त्रासदी झेलने जा रहा है।
तब अंग्रेज कम्पनी बहादुर था, अब मोदी-मित्र कम्पनी बहादुर हैं।
लेकिन आंदोलन का हर एक किसान-मज़दूर सत्याग्रही है जो अपना अधिकार लेकर ही रहेगा।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 3, 2021
एका महिन्याहून अधिक काळ उलटला तरी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू
संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली शेतकरी संघटना नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील तीन वेगवेगळ्या सीमेवर आंदोलन करीत आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात आतापर्यंत 7 फेऱ्या झाल्या आहेत. ज्यातून काहीही ठोस निघालं नाही. त्यातही दोन्ही बाजूंमध्ये दोन मुद्द्यांवरुन एकमत झालं ही दिलासादायक बाब आहे. कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. आता उद्या 4 जानेवारी रोजी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात चर्चाची पुढची फेरी होणार आहे.