Home /News /national /

राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहणार? 'हा' आहे नवा पर्याय!

राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहणार? 'हा' आहे नवा पर्याय!

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षात गोंधळ सुरू झाला आहे.

    नवी दिल्ली, 29 मे: लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षात गोंधळ सुरू झाला आहे. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. राहुल गांधींनी जरी अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव दिला असला तरी या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या उच्च स्तरावर कोणते बदल होतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक मार्गांचा विचार केला जात आहे. केवळ केंद्रीय पातळीवरच नाही तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील पक्षाची अवस्था बिकट आहे. त्याच राहुल गांधींच्या निर्णयामुळे पक्षात आणखी गोंधळ वाढला आहे. राहुल गांधींच्या निर्णयावर नाराज झालेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी मंगळवारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. पक्षातील काही नेत्यांच्या मते राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे जबाबदारी पासून पळ काढण्यासारखा आहे. पण प्रियांका यांनी या नेत्यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी पळ काढत नाही तर गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे. यासाठी प्रियांका यांनी काँग्रेसमध्ये याआधी नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तींनी पक्षाचे नेतृत्व केल्याची उदाहरणे दिली. INSIDE STORY : राहुल गांधींच्या राजीनामा नाट्यामागे आहे 'हा' मोठा प्लॅन राजीनामा न देता हा पर्याय राहुल गांधींचा निर्णय मान्य नसणाऱया पक्षातील काही नेत्यांनी अन्य पर्यायाचा विचार करण्यास सांगितले आहे. राहुल गांधींनी अध्यक्ष पदावर कायम रहावे त्यासोबत एक कार्यकारी अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष देखील नियुक्त केला जावा जो दैनंदिन कामकाजात लक्ष घालेल. जर राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला तर अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करता येईल, असे काही नेत्यांचे मत आहे. अर्थात यावर अद्याप राहुल गांधींनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. राहुल गांधींचा राजीनामा देण्याचा निर्णय, रजनीकांत म्हणाले... मंगळवारी सकाळी प्रियांका गांधी, रणदीप सुरजेवाला आणि सचिन पायलट यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. अध्यक्षपदासाठी पक्षाकडे अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला पक्षा जो बदल करायचा आहे तसा करा, पक्ष जसा चालवायचा आहे तसा चालवा. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अशी भूमिका घेतल्यानंतर राहुल गांधींनी सध्या अध्यक्षपद स्वत:कडे ठेवत पक्षाला एक महिन्याच कालावधी दिल्याचे सूत्रांकडून कळते. अटींसह अध्यक्षपदावर नव्या अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी यांचे नाव देखील चर्चेत आहे. पम यावर राहुल गांधी नाराज आहेत. त्यांच्या मते प्रियांका गांधींना यात ओढण्याची गरज नाही. सध्या त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. त्या अटी पक्षाने मान्य केल्या असून काही काळासाठी राहुल अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत. येत्या 4 दिवसात काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक बोलवण्यात येणार आहे. या बैठकीत राहुल गांधींनी दिलेल्या अटींवर सविस्तर चर्चा होणार आहे. जर एक महिन्यानंतर राहुल गांधींनी राजीनामा दिला तर CWCच्या बैठकीतच नव्या अध्यक्षाच्या नावाची चर्चा होईल. SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?
    First published:

    Tags: Congress, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या