शिख दंगलींच्यावेळेस राहुल गांधी लहान होते - चिदंबरम

शिख दंगलींच्यावेळेस राहुल गांधी लहान होते - चिदंबरम

कांग्रेस सत्तेवर असताना 1984 साली देशात शिख संप्रदायाविरोधात दंगली उसळल्या होत्या. आता राहूल गांधी यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. अशी सावध प्रतिक्रिया माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : कांग्रेस सत्तेवर असताना 1984 साली देशात शिख संप्रदायाविरोधात दंगली उसळल्या होत्या. देशासाठी ही अत्यंत खेदजनक बाब होती. मात्र, आता राहुल गांधी यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. कारण त्यावेळेस ते लहान होते अशी सावध प्रतिक्रिया माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलीय.

कोलकात्यात पार पडलेल्या एका पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ही खेदजनक बाब कांग्रेसच्या कार्यकाळात घडली आहे आणि त्यासाठी डॉ. मनमोहन सिंह यांनी संसदेत माफीसुद्धा मागितलीय. पण, आता त्या दंगलींसाठी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही, कारण ते त्यावेळेस 13 - 14 वर्षांचेच होतेच. शुक्रवारी ब्रिटेनमध्ये राहुल गांधी यांनी 1984 मध्ये भारतात उसळलेल्या या दंगलीसाठी काँग्रेस जबाबदार नसल्याचे म्हटले होते. यांच्या या वक्तव्यावर चिदंबरम यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय.

यावेळी चिदंबरम यांनी राफेल या लढाऊ विमानासाठी झालेल्या फ्रान्स बरोबर झालेल्या करारावर भाष्य करीत, भाजप सरकारवर प्रहार केला. देशासाठी ही गंभीर बाब असून, या कराराची सखोल चौकशी व्हायला हवी असेही ते यावेळी म्हणाले. यूपीएचे सरकार असतानाच राफेल करार झालाय. 126 लढाऊ विमानांसाठी 526 कोटी रुपयांचा हा करारा झाला होता. करारानुसार फ्रान्स 18 लढाऊ विमाने पूर्णतः तयार करून भारताला देणार होता. आणि उर्वरित विमानांची बांधणी भारतात होणार होती.

वास्तविक पाहता 26 लढाऊ विमानांसाठी किमान 18940 कोटी खर्च यायला हवा होता. पण, मोदी सरकारने राफेल करारासाठी फ्रान्सबरोबर जो जो करार केलाय, त्याची किम्मत किती याचा उलगडाच होत नसल्याचे ते म्हणाले. राफेलसाठी 60145 कोटी खर्च होतील असे गृहीत धरल्यास, प्रति विमान मोदी सरकारला 1670 कोटी रुपयांत पडणार हे निश्चि म्हणावे लागेल असे ते म्हणाले.

कांग्रेस ने राफेल विषयावरून मोदी सरकारला आणि बीजेपीला कोंडित पकडण्याची रणनीति तायार केली आहे. कांग्रेसचे पन्नसहून अधिक नेते या मुद्यावर 100 शहरांत मोदी सरकारच्या विरोधात प्रेस कॉन्फ्रेंस घेणार असल्याचेही चिदंबरम यांनी यावेळी स्पष्ट केले.

VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

First published: August 25, 2018, 5:33 PM IST

ताज्या बातम्या