पहिल्यांदाच काकूविरोधात प्रचारात उतरले राहुल गांधी

पहिल्यांदाच काकूविरोधात प्रचारात उतरले राहुल गांधी

सुलतानपूरहून काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी सुलतानपूरला आले होते.

  • Share this:

सुलतानपूर (उत्तर प्रदेश), 4 मे : लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान होत आहे. त्यामध्ये अमेठी, रायबरेली, सुलतानपूर अशा गांधी घराण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या मतदारसंघांचा समावेश आहे. सुलतानपूरहून काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी सुलतानपूरला आले होते. याच मतदारसंघातून गांधी घराण्याची दुसरी सून मनेका गांधी निवडणूक लढवत आहेत. मनेका अर्थातच भाजपच्या उमेदवार आहेत.

सुलतानपूरमध्ये आपली सख्खी काकू मनेका गांधी यांच्याविरोधात प्रचार करायला दाखल झालेले राहुल आता मनेका यांच्याबद्दल काही बोलतात का याविषयी उत्सुकता होती. पण राहुल यांनी मनेका यांच्यावर वैयक्तिक टीका करणं टाळलं. त्यांनी मनेका यांचं नावही घेतलं नाही. त्यांच्या प्रचाराचा मुद्दा नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरत होता. "नरेंद्र मोदींमध्ये दम नाही, PM मुझसे डरते है", असं राहुल म्हणाले. ते मुद्दामच माझ्यासमोर येत नाहीत, कारण ते सामना करायला घाबरतात, असंही ते म्हणाले.

मनेका लढल्या होत्या अमेठीतून

गेली काही वर्षं मनेका गांधी यांनी सुलतानपूर आणि पिलीभीत या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करत आहेत. पण मनेका यांनी पहिली निवडणूक लढली होती अमेठीमधून. कारण गांधी घराण्यात पहिल्यांदा संजय गांधी म्हणजे मनेका यांच्या पतीने अमेठीतून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.

Love Story : ...म्हणून संजय गांधींच्या लग्नाबद्दल सगळ्या देशाला होती उत्सुकता

गांधी घराण्याच्या आपसातल्या संघर्षामुळे 'या' मतदारसंघाकडे आहे लक्ष

त्यानंतर हा मतदारसंघ राजीव गांधी आणि त्यांच्यानंतर सोनिया गांधींकडे आला.

जेव्हा अमेठीतून संजय गांधींचा पराभव झाला...

1977च्या लोकसभा निवडणुकीत संजय गांधी यांचा अमेठीतून पराभव झाला होता. विशेष म्हणजे संजय गांधी यांची ही पहिली निवडणूक होती. पण आणीबाणीमुळे इंदिरा गांधी यांच्या सरकारबद्दल लोकांच्या मनात प्रचंड नाराजी होती. त्याचा फटका संजय गांधी यांना बसला. जनता पक्षाच्या रविंद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधींचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला संजय गांधी यांनी ३ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत सिंह यांचा पराभव करून घेतला.

राजीव गांधी यांनी शरद यादवांचा केला पराभव

खासदार झाल्यानंतर काही महिन्यातच संजय गांधी यांचा मृत्यू झाला. 1981मध्ये अमेठीत पोटनिवडणूक झाली. तोपर्यंत राजीव गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. त्यांनी राजकीय प्रवेशासाठी अमेठीची निवड केली होती. राजीव गांधींच्या विरुद्ध चौधरी चरण सिंह यांच्या पक्षाचे उमेदवार शरद यादव होते. चरण सिंह पंतप्रधान राहिले होते आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. पण राजीव गांधींच्या पुढे शरद यादव यांचा प्रभाव दिसला नाही. राजीव गांधी यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

अमेठीतून लढताना पहिल्याच निवडणुकीत गांधी कुटुंबातील या व्यक्तीचा झाला पराभव!

'आम्ही महात्मा गांधींची मुलं नाही', मनेका गांधींचं वादग्रस्त वक्तव्य

1984ची ऐतिहासिक निवडणूक

गांधी कुटुंबासाठीचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या अमेठीमधून गांधी घरातील दोन व्यक्ती निवडणूक लढवत आहेत, असे आज कोणाला सांगितले तर त्यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण 1984च्या निवडणुकीत गांधी कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकाविरुद्ध लढले. एका बाजूला राजीव गांधी तर दुसऱ्या बाजूला मनेका गांधी अशी ही लढत झाली होती. पण या लढतीत मनेका गांधी यांची अनामत रक्कम जप्त झाली. राजीव गांधी यांना 3 लाख 65 हजार 041 मते मिळाली हे प्रमाण एकूण मतांच्या 83.67 टक्के इतके होते. मनेका गांधी यांना केवळ 50 हजार 163 मते मिळाली.

सोनिया गांधींची राजकारणातील एन्ट्री

राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले होते. पण जेव्हा राजकारणात येण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी त्याच मतदारसंघाची निवड केली जेथून राजीव गांधी विजयी व्हायचे. 1999मध्ये सोनिया गांधी यांनी पहिली निवडणूक लढवली आणि त्यात त्यांनी दणदणीत विजय देखील मिळवला. सोनिया गांधी यांनी संजय सिंह यांचा जवळ जवळ 3 लाख मतांनी पराभव केला.

VIDEO राहुल गांधी यांची EXCLUSIVE मुलाखत

First published: May 4, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading