पाहा VIDEO : राहुल गांधींची RSS वर जहरी टीका

पाहा VIDEO : राहुल गांधींची RSS वर जहरी टीका

आसाम राज्य नागपूरला चालवू देणार नाही. आसामला चड्डीवाले चालवू शकत नाहीत, आसामची जनता आसाम चालवेल, असं राहुल गांधी म्हणाले.

  • Share this:

गुवाहाटी, 28 डिसेंबर : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभऱात आंदोलन पेटलं आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली.

आम्ही भाजप आणि RSS ला आसामचा इतिहास, भाषा, संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसाम राज्य नागपूरला चालवू देणार नाही. आसामला चड्डीवाले चालवू शकत नाहीत, आसामची जनता आसाम चालवेल, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजप सरकारच्या धोरणामुळे आसाम हिंसाचाराच्या मार्गाने जाण्याचा धोका आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्राने आणलेला सुधारित नागरिकत्व कायदा हा नोटबंदीचाच दुसरा भाग आहे. द्वेष आणि रागाने आसाम पुढे जाणार नाही. आसाम अकॉर्डच्या माध्यमातून इथे शांतता प्रस्थापित झाली आहे. आसाम अकॉर्डचा आवाज दाबला जाऊ नये, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

काँग्रेस नेत्यांनी आज 135 वा स्थापना दिवस साजरा केला. पक्षासाठी भारत पहिला,असं त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए.के. अँटनी यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसने देशभरात 'संविधान बचाओ, भारत बचाओ' हा संदेश घेऊन ठिकठिकाणी मोर्चे काढले आहेत.

(हेही वाचा : 'दिल्लीवालोंसे डर लगता है', गुलजार यांचे मोदी आणि अमित शहांवर शब्दबाण!)

याआधीही राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली होती. गांधीजींच्या हत्येमध्ये संघाचा सहभाग होता, अशी टीका त्यांनी भिवंडीमधल्या सभेत केली होती. त्यानंतर त्यांच्यावर बदनामीचा खटलाही दाखल करण्यात आला होता.

========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 28, 2019, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading