राफेल : 'पर्रिकर आणि सीतारमण नाही... घोटाळ्याचा माझा आरोप थेट नरेंद्र मोदींवर'

राफेल : 'पर्रिकर आणि सीतारमण नाही... घोटाळ्याचा माझा आरोप थेट नरेंद्र मोदींवर'

रक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी राफेलवर सरकारची भूमिका मांडल्यानंतर राहुल गांधींनी सरकारवर पलटवार केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जानेवारी : राफेल घोटाळ्याचा माझा आरोप मनोहर पर्रिकर आणि निर्मला सीतारमण यांच्यावर नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारवर हल्लाबोल केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी राफेलवर सरकारची भूमिका मांडल्यानंतर राहुल गांधींनी सरकारवर पलटवार केला.

राफेलचं कॉन्ट्रॅक्ट एचएएल या सरकारी कंपनीकडून काढून ते अनिल अंबानी यांना का देण्यात आलं, असा सवाल करत राहुल गांधींनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरकारने उत्तरं दिलीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राफेलप्रकरणी काय-काय घडलं?

राफेल प्रकरणावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला भंडावून सोडलंय. बुधवारी लोकसभेत झालेल्या चर्चेतही त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूवरच त्यांनी शंका उपस्थितीत केली आणि जेपीसी मार्फेत चौकशीची मागणी केली. या चर्चेनंतरही ते शांत झालेले नाहीत. जेटलींच्या भाषणाचा हवाला देत राहुल गांधींनी सरकारवरच डाव उलटवण्याचा प्रयत्न केला.

चर्चेनंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा सरकारवर आरोपांची सरबत्ती केली. किंमत सांगणार नाही असं म्हणत असतानाच अरुण जेटलींनी स्वत:च किंमत सांगितली की या आधी 526 कोटींच असलेलं विमान 1600 कोटींना घेतलं गेलं. ही किंमत का वाढविली याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे.

काय आहे राफेल वाद?

राफेलच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. राफेल करारात मोदींनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. तसंच या मुद्द्यावरून राहुल यांनी राफेल विमान बनवणाऱ्या ‘दसॉ’ या कंपनीवरही आरोप केले होते.

राहुल गांधींच्या आरोपाला ‘दसॉ’ या कंपनीच्या सीईओ यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी खोटं बोलत नाही. मी कंपनीचा सीईओ सारख्या जबाबदार पदावर आहे. त्यामुळे मी खोटं बोलण्याचा संबंधच येत नाही,’ असं म्हणत ‘दसॉ’चे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले होते.

VIDEO : अमित शहांनी भाजप खासदारांसोबत शेयर केला युतीबाबतचा 'सीक्रेट प्लान'

First published: January 4, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading