S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पुन्हा एकदा राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. डसॉल्ट कंपनीच्या सीईओच्या विधानाचा हवाला देऊन भाजप करत असलेला कांगावा कसा खोटा आहे हे दाखवून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Updated On: Oct 11, 2018 02:21 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पुन्हा एकदा राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. डसॉल्ट कंपनीच्या सीईओच्या विधानाचा हवाला देऊन भाजप करत असलेला कांगावा कसा खोटा आहे हे दाखवून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आताच फ्रान्स दौऱ्यावर का गेल्या आहेत, पंतप्रधान मोदी का गप्प बसलेत असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

डसॉल्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. राफेल प्रकरणात नरेंद्र मोदींकडून अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर ही कोणत्या गोष्टीची नुकसान भरपाई दिली असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी अनिल अंबानी यांच्या खिशात 30 हजार कोटी टाकले आहेत, असा गंभीर आरोप करत भारताचे पंतप्रधान हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पंतप्रधान अनिल अंबानी यांची चौकीदारी करत आहे. जर भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होते तर नरेंद्र मोदींवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली.

'SHIVDE I AM SORRY' नंतर पिपंरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 01:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close