मी घाबरत नाही हाच मोदी आणि माझ्यात फरक-राहुल गांधी

मी घाबरत नाही हाच मोदी आणि माझ्यात फरक-राहुल गांधी

मोदी त्यांची भीती दाखवू शकत नाहीत अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

  • Share this:

अजमेर, 14 फेब्रुवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची मालिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून सुरूच आहे. 'मी घाबरत नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची भीती दाखवू शकत नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी तिरस्कारची भावना पसरवत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राजस्थानमधील अजमेर येथे कार्यकर्त्यांशी बोलत असताना त्यांनी विविध मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

'ज्यावेळी लोकसभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली त्यावेळी माझ्या मनात तिरस्काराची भावना नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझा, माझ्या परिवाराचा, काँग्रेसचा अपमान केला. पण, एक गोष्ट ध्यानात घ्या तिरस्कारला केवळ प्रेमानंच पराभूत केलं जाऊ शकतं', अशा शब्दात राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट देखील हजर होते.

जीएसटी, नोटाबंदी, शेतकरी कर्जमाफीवरून हल्लाबोल

यावेळी राहुल गांधींनी जीएसटी, नोटाबंदी आणि शेतकरी कर्जमाफीवरून देखील भाजपवर हल्लाबोल केला. तीन राज्यांमध्ये सत्ता येताच आम्ही शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. पण, भाजप सरकार मात्र केवळ काही मित्रांसाठीच काम करत आहे. अशी टीका देखील यावेळी राहुल गांधी यांनी केली.

">

विचारांमधील लढाई

काँग्रेस आणि भाजपमधील लढाई ही विचारांची लढाई आहे. एका बाजूला आरएसएस, भाजप आणि दुसऱ्या बाजुला काँग्रेसची विचारधारा आहे. भाजपनं काँग्रेस मुक्त भारतची हाक दिली आहे. 2019मध्ये आम्ही भाजपला हरवू. पण, त्यांना संपवण्याची भाषा केव्हाच करणार नाही. असा टोला देखील यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसला लगावला.

">

First published: February 14, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading