सुप्रीम कोर्टालाही वाटतं 'चौकीदार'च चोर आहे - राहुल गांधी

सुप्रीम कोर्टालाही वाटतं 'चौकीदार'च चोर आहे - राहुल गांधी

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही राफेलवर कोर्टात मोठी लढई लढावी लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 10 एप्रिल : सुप्रीम कोर्टाच्या निर्दशानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. आता केवळ देशालाच नाही तर सुप्रीम कोर्टालाही वाटतं की चौकीदारच चोर आहे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पुन्हा खुल्या चर्चेचं आव्हान दिलं. पंतप्रधानांनी फक्त 15 मिनिटं माझ्याशी खुली चर्चा करावी असं राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधानांना चर्चेची का भीती वाटते? असा सवालही त्यांनी केला. सरकारने कितीही ठरवलं तरी ते आता काहीही दडवू शकणार नाहीत असंही ते म्हणाले.

काय झालं सुप्रीम कोर्टात

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला मोठा झटका दिला. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. शिवाय, याप्रकरणामध्ये नव्या पुराव्यांच्या कागदपत्रांवर घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं फेटळून लावला आहे.

त्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसनं भाजपला लक्ष्य करत 'अब होगा न्याय' असं म्हटलं आहे. तसेच, मोदी सरकारनं राफेल बाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयापासून लपवून ठेवली. पण, न्यायालयाच्या निर्णयामुळे न्याय मिळेल असं काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

कुणी दाखल केली होती याचिका

राफेल खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. यासंदर्भात यशवंत सिन्हा, अरूण शौरी आणि वकिल प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी राफेल खरेदीसंदर्भातील दस्तावेज चोरी झाल्याची माहिती सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली होती आणि नंतर ते मत मागेही घेतलं होतं.

या आधी सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी कुठलाह संशयास्पद व्यवहार झाला नाही असं म्हणत सर्व याचिका फेटाळल्या होत्या. त्यानंतर सिन्हा, शौरी आणि प्रशांत भूषण यांनी नवी कागदपत्र कोर्टात सादर करत या आधीच्या निकालाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली होती. आता सुप्रीम कोर्ट ही नवी कागदपत्र पाहून या प्रकरणाची चौकशी करायची किंवा नाही याबाबत आदेश देणार आहे.

काय आहे प्रकरण?

फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून 36 राफेल विमानांची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, ही खरेदी अधिक दरानं झाल्याचं सांगत त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं.  आता न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळे विरोधकांना पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे.

First published: April 10, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading