'नरेंद्र भाई बात नहीं बनी',हाफिजच्या सुटकेवर राहुल गांधींचा मोदींना टोला

'नरेंद्र भाई बात नहीं बनी',हाफिजच्या सुटकेवर राहुल गांधींचा मोदींना टोला

गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका करण्यास कोणतीही संधी सोडत नाहीये.

  • Share this:

25 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तानच्या कोर्टाने जामीन दिलाय. याच मुद्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 'नरेंद्र भाई बात नहीं बनी' असं टि्वट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका करण्यास कोणतीही संधी सोडत नाहीये. अलीकडे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध दृढ झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांच्या दबाबानंतर हाफिज सईदला अटक करण्यात आली असा दावा केला गेला.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुरुवारी पाकिस्तानच्या कोर्टाने हाफिज सईदची मुक्तता केलीये. हाफिज सईदच्या या जामिनावर भारताने नाराजी व्यक्त केलीये.  अमरिकेनंही याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.

आज राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड सुटलाय नरेंद्रभाई बात नहीं बनी' असं टि्वट राहुल गांधींनी केलंय.

First published: November 25, 2017, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading