VIDEO : पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची मोठी टिका; 'सर्व चोरांचं नाव मोदी का?'

VIDEO : पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची मोठी टिका; 'सर्व चोरांचं नाव मोदी का?'

रांची येथे बोलत असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

रांची, 2 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. झारखंडमधील रांची येथे बोलत असताना त्यांनी सर्व चोरांचं नाव मोदी का? अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. जाहीर सभेत बोलताना त्यांनी मला एक गोष्ट सांगा, सर्व चोरांचं नाव मोदी का? ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी. अशी टीका केली. सध्या लोकसभा प्रचाराची रणधुमाळी पाहायाला मिळत आहे. शुक्रवारी राहुल गांधी यांनी धुळे येथे जाहीर सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये देखील सभा घेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी चौकीदार ही चोर है, अशी टिका नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती.

राफेल करार आणि नरेंद्र मोदी

राफेल करारामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला आहे. त्यावरून त्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. संसदेतील ही लढाई रस्त्यावर देखील पाहायाला मिळाली. राफेल करारावरून चौकीदार ही चोर है, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दिली. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये राफेल कराराचा मुद्दा देखील गाजणार असंच दिसत आहे.

VIDEO :  'राजकारण सोडा राहुलबाबा; 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीही बरंच काही करू शकला असता'

First published: March 2, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading