राजघाटावर राहुल गांधींच्या उपवासाला सुरुवात

राजघाटावर राहुल गांधींच्या उपवासाला सुरुवात

राहुल गांधी सध्या राजघाटावर उपवासावर बसले आहेत. देशात सलोख्याचं वातावरण कायम रहावं, हा संदेश देण्यासाठी आज काँग्रेस देशभरात लाक्षणिक उपवास करतेय.

  • Share this:

दिल्ली, 09 एप्रिल : राहुल गांधी सध्या राजघाटावर उपवासावर बसले आहेत. देशात सलोख्याचं वातावरण कायम रहावं, हा संदेश देण्यासाठी आज काँग्रेस देशभरात लाक्षणिक उपवास करतेय. राहुल गांधी खरंतर सकाळी 11 वाजता पोहोचणार होते. पण त्यांना उशीर झाला. नंतर साडेबाराची वेळ दिली होती. पण राहुल दुपारी 1 नंतर राजघाटावर पोहोचले.दलितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात हे आंदोलन करण्यात येतंय.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते उपोषणावर बसलेत. अशोक चव्हाण परभणीत तर मुंबईत संजय निरुपम उपोषण करतायत. भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे, सलोखा कायम रहावा हा संदेश पोहोचवण्यासाठी काँग्रेसनं हे उपोषण करण्याचं ठरलवंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2018 10:57 AM IST

ताज्या बातम्या