भाजपाने मसूद अझहरची सुटका केली नव्हती का? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

भाजपाने मसूद अझहरला कारागृहातून बाहेर काढत पाकिस्तानात पाठवलं नव्हतं का?, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 01:30 PM IST

भाजपाने मसूद अझहरची सुटका केली नव्हती का? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

नवी दिल्ली,10 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 'पंतप्रधान मोदींनी देशाच्या जनतेला सांगितले पाहिजे की एनडीए सरकारने 1999 साली जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची देशाच्या कारागृहातून सुटका करुन त्याला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय का घेतला होता?'. शनिवारी कर्नाटकातील जनसभेला संबोधित करताना राहुल गांधींनी तत्कालीन वाजपेयी सरकारने अझहरच्या केलेल्या सुटकेवरुन पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला.

1999मध्ये वाजपेयी सरकारनं दहशतवाद्यांच्या तावडीतून एका प्रवासी विमानाची सुखरुप सुटका करण्यासाठी मसूद अझहरला पाकिस्तानात सोडण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेचा उल्लेख करत राहुल गांधींनी म्हटलं की, 'मसूद अझहर पाकिस्तानात पुन्हा कसा केला?, कोणत्या सरकारने त्याची सुटका केली ?', याची माहिती पंतप्रधान मोदींनी जनतेला द्यावी.

'मसूद अझहरची सुटका कोणी केली?'

कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा उल्लेख करत राहुल गांधींनी शनिवारी (9 मार्च)पंतप्रधान मोदींना टार्गेट केले.सभेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. याबाबत पंतप्रधानांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. या जवानांना कोणी मारलं? जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याचे नाव काय आहे?...मसूद अझहर... मसूदची सुटका करुन त्याला पाकिस्तानात कोणी पाठवलं? तत्कालीन भाजपा सरकारने त्याला पाकिस्तानात पाठवलं नव्हतं का?. आणि त्यावेळेस मसूदला पाकिस्तानच्या ताब्यात सोपवण्याची जबाबदारी तुम्ही अजित डोवल यांच्याकडे सोपवली नव्हती का?  तुम्ही विसरलात का तत्कालीन भाजपा सरकारनेच मसूदला भारताच्या कारागृहातून सुटका करत पाकिस्तानात पाठवलं होतं?', अशा प्रकारे अनेक प्रश्नांची सरबत्ती करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

कंदहार विमान अपहरण

Loading...

दरम्यान, 1999मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारला कंदहारमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले प्रवासी विमान वाचवण्यासाठी मसूद अझहरीची सुटका करावी लागली होती. 1994मध्ये काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीनचा सदस्य असल्याच्या कारणावरुन मसूद अजहरविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याला सोडवण्यासाठी दहशतवाद्यांनी कंदहारमध्ये विमानाचं अपहरण केले होतं.वाचा : हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांना लष्करी कारवाईत सोबत न्या, संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेनं स्वीकारली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात एअर स्ट्राईकची कारवाई करत दहशतवाद्यांची अनेक तळ उद्धवस्त केली.

दरम्यान, एअर स्ट्राईक राजकारण केलं जात असल्याचा आरोप-प्रत्यारोप भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर करत आहेत. काँग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांकडून भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईच्या पुराव्यांची मागणी वारंवार केली जात आहे. यावरुन पंतप्रधान मोदी विरोधकांवर सडकून टीका करतानाही दिसत आहेत. विरोधकांकडून पाकिस्तानला समर्थन दर्शवली जाणारी वक्तव्यं केली जात असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.

VIDEO : 'पुलवामा'आधी अजित डोवल आणि पाकच्या सल्लागारासोबत थायलंडमध्ये गुप्त बैठक - राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 07:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...